उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:24 AM2021-08-17T04:24:18+5:302021-08-17T04:24:18+5:30
‘स्वच्छ इंधन, बेहतर जीवन’ असा नारा देत केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत देशातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना मोफत घरगुती एल.पी.जी. ...
‘स्वच्छ इंधन, बेहतर जीवन’ असा नारा देत केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत देशातील दारिद्र्यरेषेखालील महिलांना मोफत घरगुती एल.पी.जी. गॅस देण्याचा निर्णय घेतला होता; परंतु गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांनी गॅस सिलिंडर बाजूला ठेवून पुन्हा एकदा आपला मोर्चा चुलीकडे वळविला आहे. त्यामुळे शासनाची ही योजना कागदावर राहिली आहे.
सिलिंडर भरणे कसे परवडणार?
सारखं गॅस सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे गॅस वापरणे आता परवडत नाही. त्यामुळे नाईलाजाने पुन्हा एकदा चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे.
- कांता विठ्ठल अंभोरे, नांदगाव
पूर्वी गॅस सिलिंडर घेतल्यानंतर सबसिडी मिळत होती. आता तीही मिळत नाही. शिवाय किंमत वाढल्याने गॅसवर स्वयंपाक करणे परवडत नाही.
- सीमाबाई काळे, पिंपरी
सरकार नावालाच योजना सुरू करते. त्यांना जनतेशी काहीही घेणे-देणे नाही. त्यामुळेच योजनेच्या नावाखाली गरिबांची थट्टा चालवली आहे. याबद्दल संताप वाटतो.
- लक्ष्मीबाई मस्के, वडगाव