बुद्धभूमी विहार परिसर नंदनवन करणार - वृक्षमित्र गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:13 AM2021-06-23T04:13:02+5:302021-06-23T04:13:02+5:30

नांदगाव खुर्द येथील बुद्धभूमी विहार परिसरात नुकतेच वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायकवाड बोलत होते. या ...

Buddhabhumi Vihar will be a paradise - Vrikshmitra Gaikwad | बुद्धभूमी विहार परिसर नंदनवन करणार - वृक्षमित्र गायकवाड

बुद्धभूमी विहार परिसर नंदनवन करणार - वृक्षमित्र गायकवाड

Next

नांदगाव खुर्द येथील बुद्धभूमी विहार परिसरात नुकतेच वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायकवाड बोलत होते. या कार्यक्रमाला बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सायस मोडके, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष मार्शल सचिन कांबळे, डॉ. श्यामसुंदर वाघमारे, किरण मानवतकर, गोपीनाथ कांबळे आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी गायकवाड म्हणाले की, विविध प्रजातींची, फुलांची, फळांची वृक्ष लागवड करून निसर्गचक्र अबाधित ठेवत या परिसराचे नंदनवन आपण लोकसहभागातून करू, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी प्रा. शिवाजी कांबळे यांनी गीत गायनातून समाजप्रबोधन केले. कार्यक्रमाला मार्शल विकास भराडे, शहराध्यक्ष मार्शल विजय सावंत, डॉ. सिद्धार्थ वसेकर, बालासाहेब जोंधळे, रामराव जोंधळे पाटील, इंजिनिअर अमोल मानवतकर, पैठणे, इंगोले, लक्ष्मण जोंधळे, वसंतराव जोंधळे, गजानन जोंधळे, बाबासाहेब जल्हारे, किरण जोंधळे, विश्वजीत गायकवाड, माजी सरपंच दिलीपराव जोंधळे आदी उपस्थित होते.

Web Title: Buddhabhumi Vihar will be a paradise - Vrikshmitra Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.