सेवानिवृत्त अभियंत्याच्या घरामध्ये चोरी; देवघरातील चांदीच्या मूर्ती, दागिन्यांवर डल्ला

By राजन मगरुळकर | Published: November 24, 2023 05:19 PM2023-11-24T17:19:46+5:302023-11-24T17:20:08+5:30

व्यंकटेशनगरातील प्रकार : सवादोन लाखांचा मुद्देमाल लंपास

Burglary at Retired Engineer's House; the silver idols, ornaments in the temple looted | सेवानिवृत्त अभियंत्याच्या घरामध्ये चोरी; देवघरातील चांदीच्या मूर्ती, दागिन्यांवर डल्ला

सेवानिवृत्त अभियंत्याच्या घरामध्ये चोरी; देवघरातील चांदीच्या मूर्ती, दागिन्यांवर डल्ला

परभणी : दिवाळीनिमित्त मुलाकडे अकोला येथे गेलेल्या एका सेवानिवृत्त अभियंत्याच्या घरामध्ये चोरीची घटना घडली आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. यामध्ये चोरट्याने घराचे कुलूप तोडून देव- देवतांच्या मूर्ती आणि दागिने असा एकूण दोन लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना व्यंकटेशनगर भागात घडली आहे. गुरुवारी गुन्हा नोंद झाला. 

पाटबंधारे खात्यातून अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले भगवान अप्पाराव घुगे यांनी फिर्याद दिली. भगवान घुगे व त्यांची पत्नी हे दोघेही अकोला येथे मुलाकडे दिवाळीनिमित्त नऊ नोव्हेंबरला गेले होते. यावेळी त्यांनी घरी वॉचमन म्हणून सुधाकर पांचाळ यांना लक्ष देण्यास सांगितले होते. यातच १८ नोव्हेंबरला सायंकाळी सुधाकर पांचाळ हे हयातनगर येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी ते घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. यावरून त्यांनी सदरील माहिती भगवान घुगे यांना कळविली.

घुगे यांचे नातेवाईक राजेश गिते यांनी घरी येऊन पाहणी केली असता घरातील अलमारी उघडी दिसली व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. बुधवारी सकाळी व्यंकटेशनगर येथील घरी भगवान घुगे परतले असता त्यांना चोरी गेलेल्या विविध वस्तू दिसून आल्या. यामध्ये चांदीची तीनशे ग्रॅम वजनाची गणपतीची मूर्ती, एक साईबाबाची मूर्ती यासह चांदीचे विविध साहित्य, चमचे, वाट्या, करंडे, तांब्या अशा बाबी चोरीला गेल्याचे दिसून आले. यात सुमारे दोन लाख ३४ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याप्रकरणी त्यांनी फिर्याद दिली आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार करीत आहेत.

 

Web Title: Burglary at Retired Engineer's House; the silver idols, ornaments in the temple looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.