गंगाखेड शहरात मध्यवस्तीत घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:10 AM2020-12-28T04:10:03+5:302020-12-28T04:10:03+5:30

गंगाखेड : घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने घराच्या गेटसह दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील ...

Burglary in Gangakhed city center | गंगाखेड शहरात मध्यवस्तीत घरफोडी

गंगाखेड शहरात मध्यवस्तीत घरफोडी

Next

गंगाखेड : घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने घराच्या गेटसह दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू व रोख रक्कमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

गंगाखेड शहरातील तहसील कार्यालय, पंचायत समितीच्या समोरील व्यापारी संकुलातील दोन व अन्य एक अशी तीन दुकाने फोडल्याची घटना २४ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. यामध्ये सुकामेवा, रोख रकमेसह बिअरच्या बॉटल्या पळविल्या होत्या. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेचा तपास सुरू होतो की नाही, लगेच २६ डिसेंबर रोजी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या देवळे जिनिंग परिसरातील नितीन वसंतराव तेललवार यांचे कुटुंब बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कंम्पाऊंडवॉलच्या भिंतीवरून घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी रॉडने चॅनेल गेट व घराचे कुलूप तोडले. कपाटात ठेवलेले २२ तोळे वजनाच्या चांदीच्या वस्तू, दोन तोळे वजनाचे सोने असे दागिने व रोख दीड लाख रुपये असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तेललवार कुटुंबीय परत आल्यानंतर घरफोडीची घटना उघडकीस आली. त्यानंतर नितीन तेललवार यांनी रविवारी सकाळी गंगाखेड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नितीन तेललवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, जमादार रंगनाथ देवकर हे करीत आहेत.

Web Title: Burglary in Gangakhed city center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.