सासू-सुनेने अधिकाºयावर भिरकावली चप्पल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 10:22 PM2017-09-19T22:22:34+5:302017-09-19T22:22:34+5:30

पकडलेली जीप सोडून देण्याच्या कारणावरुन जीपचालकाच्या परिवारातील सासू-सुनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांशी हुज्जत घालून त्यांच्या खुर्चीच्या दिशेने चप्पल भिरकावल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास परभणीत घडला.

Burglary slippers at the mother-in-law officer | सासू-सुनेने अधिकाºयावर भिरकावली चप्पल

सासू-सुनेने अधिकाºयावर भिरकावली चप्पल

googlenewsNext
ठळक मुद्देपकडलेली जीप सोडून देण्याचे कारण

परभणी :  पकडलेली जीप सोडून देण्याच्या कारणावरुन जीपचालकाच्या परिवारातील सासू-सुनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांशी हुज्जत घालून त्यांच्या खुर्चीच्या दिशेने चप्पल भिरकावल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास परभणीत घडला. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
आॅगस्ट महिन्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेसाठी इतर जिल्ह्यातून परभणीत पथक आले होते. या पथकाने २२ आॅगस्ट रोजी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत असल्याने शहरातील गंगाखेड रोडवर एम.एच.२६/एल ५५८ ही जीप पकडली.  गंगाखेड येथील भारत दराडे यांची ही जीप आहे. २३ आॅगस्ट रोजी जीप सोडवून नेण्यासंदर्भातील पत्र आरटीओ कार्यालयांकडून दराडे यांना पाठविण्यात आले होते. याच प्रकरणात १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भारत दराडे यांचा मुलगा सुनील, पत्नी सुरेखा, आई दगडूबाई असा संपूर्ण परिवार प्रशासकीय इमारत परिसरातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात दाखल झाला. कागदपत्र दाखवा आणि गाडी घेऊन जा, असे त्यांना सांगण्यात आले. यातूनच वाद वाढत गेला आणि सासू व सुनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश जाधव यांच्या खुर्चीच्या दिशेने चप्पल भिरकावली व शिवीगाळही केली. नवा मोंढा ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही.व्ही. श्रीमनवार, सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे  घटनास्थळी दाखल झाले.
परस्परविरोधी तक्रारीवरुन गुन्हा दाखल
या प्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश जाधव यांच्या तक्रारीवरून सुनील दराडे, सुरेखा दराडे व दगडूबाई दराडे यांच्याविरूद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे़ तसेच सुरेखा दराडे यांनीही तक्रार दिली असून, त्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रकाश जाधव यांनी विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ त्यावरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला आहे़

Web Title: Burglary slippers at the mother-in-law officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.