चार एकरवरील ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:14 AM2021-01-02T04:14:56+5:302021-01-02T04:14:56+5:30

पाथरी : तालुक्यातील बाभळगाव शिवारामध्ये विद्युत प्रवाहित तारांच्या घर्षणातून लागलेल्या आगीमध्ये एका शेतकऱ्याचा ४ एकरवरील ऊस ठिबक सिंचनासह जळून ...

Burn four acres of sugarcane | चार एकरवरील ऊस जळून खाक

चार एकरवरील ऊस जळून खाक

Next

पाथरी : तालुक्यातील बाभळगाव शिवारामध्ये विद्युत प्रवाहित तारांच्या घर्षणातून लागलेल्या आगीमध्ये एका शेतकऱ्याचा ४ एकरवरील ऊस ठिबक सिंचनासह जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील शेतकरी माणिक मदन गिराम यांची गट क्रमांक ९ मध्ये शेती आहे. त्यात त्यांनी मागील हंगामात उसाची लागवड केली होती. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास त्यातील ४ एकर उसाच्या क्षेत्रावर विद्युत प्रवाहित तारांच्या घर्षणामुळे आग लागली. यामध्ये गिराम यांनी उसाला पाणी देण्यासाठी अंथरलेली पाइपलाइन व शेजारी ठेवलेले ठिबक सिंचन जळून खाक झाले. यामध्ये गिराम यांचे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरणच्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे महिनाभरात ५ ते ६ शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाल्याच्या घटना घडल्या आहेत, तरीही याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Burn four acres of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.