चालकाचा ताबा सुटल्याने बोरी येथील आश्रमाजवळ बस उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 05:21 PM2021-09-06T17:21:09+5:302021-09-06T17:23:10+5:30
अचानक चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून उलटली.
बोरी (परभणी ) : जिंतूर आगाराची बस परभणीकडे जात असताना बोरी येथील महानुभाव आश्रमाजवळ उलटल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली. यात बस मधील सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिंतूर आगराची बस ( एम एच 20 बी एल 34 94 ) ३० प्रवास्यांना घेऊन परभणीकडे जात होती. अचानक चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून उलटली. यात बस चालकासह सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.माहिती मिळाल्यानंतर बोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जराड, पोलीस उपनिरीक्षक पंडित शिरसे, दिलीप वळसे, जमादार किशन पतंगे यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच जिंतूर आगार प्रमुख व्ही आर चिबडे, वाहतूक नियंत्रक एम पी गावंडे, वाहतूक लिपिक जी के घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी युवा काँग्रेसचे नागसेन भेरजे, मुसावीर खाँ पठाण यांनी मदत केली
हेही वाचा - ओव्हर फ्लो तलावात तरूणांचा जीवघेणा स्टंट; जिव धोक्यात घालून पोहण्यासाठी उड्या.
या जखमी प्रवास्यांची नावे :
शांताबाई कोळी ( 45, जिंतूर ), संगीता युवराज कोळी ( 23, जिंतूर), जग्गूनिसा अमजद खान ( 60, सेलू ), आसिफा राहणार ( सेलु) , मनकर्णाबाई वैद्य ( 50, मंठा ), सुभद्राबाई वैद्य ( मंठा ) आणि बसचालक दत्ता घुगे ( रांजणगाव ) यांच्यावर बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर अति गंभीर जखमी असलेल्या तीन प्रवास्यांना अधिक उपचारांसाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
हेही वाचा - करुणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी