वसमतजवळ बस उलटली; दहा प्रवासी किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 03:32 PM2020-01-14T15:32:05+5:302020-01-14T15:32:43+5:30
बसचा वेग कमी असल्याने मोठी जीवितहानी झाली नाही.
वसमत : तालुक्यातील तेलगावपाटीजवळ अरुंद रस्त्यवर समोरून येणाऱ्या वाहनास जाण्यासाठी जागा देण्याच्या प्रयत्नात माजलगाव-नांदेड बस उलटली. यात बसमधील १० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसचा वेग कमी असल्याने मोठी जीवितहानी झाली नाही.
याबाबत, अधिक माहिती अशी की, कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर आज दुपारी १.३० वाजेच्या सुमारास माजलगावहून बस ( क्र एम एच 20 बी एल 0638 ) नांदेडकडे हात होती. येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने समोरून येणाऱ्या वाहनास जागा देण्याच्या प्रयत्नात बाद रस्त्याच्या खाली उतरली व उलटली. यावेळी बसचा वेग कमी असल्याने मोठी हानी झाली नाही. बसच्या काचा फुटल्या असून बसमधील २३ प्रवास्यांपैकी १० प्रवास्यांना किरकोळ मार लागला आहे. जखमी प्रवासी मिळेल त्या वाहनाने नांदेड, परभणीकडे उपचारासाठी रवाना झाले आहेत.
घटनेचा वृत्त समजताच हट्टा पोलीस स्टेशनचे सपोणी गजानन मोरे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोंचले आहेत. त्यांनी जखमींना उपचारासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.