किरायेदार म्हणून आले; घरमालक समजू लागले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:25+5:302021-07-08T04:13:25+5:30
राहत्या जागेत अधिकचे बांधकाम करून त्या खोल्या किरायाने देण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. आर्थिक हातभार लागावा, त्याचप्रमाणे चांगला ...
राहत्या जागेत अधिकचे बांधकाम करून त्या खोल्या किरायाने देण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. आर्थिक हातभार लागावा, त्याचप्रमाणे चांगला सोबती मिळावा, या उद्देशाने घर किरायाने दिले जाते. मात्र मागच्या काही वर्षांपासून किरायाने घर घेतल्यानंतर त्याच घरावर हक्क सांगण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषत: घरमालक अन्य गावात राहत असेल, तर ती जागा बळकावण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आपले हक्काचे घर सांभाळण्यासाठी घरमालकांनाच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
घर किरायाने देताना ही घ्या काळजी...
n स्वत:चे घर किरायाने देताना घरमालकांना आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. किरायेदार हा शक्यतो बऱ्यापैकी ओळखीतील असावा. त्याचप्रमाणे घर किरायाने देण्यापूर्वी त्याच्यासोबत करार करणे आवश्यक आहे.
n किरायाने येणाऱ्या व्यक्तींचे आधार क्रमांक, त्यांचा कायमचा राहण्याचा पत्ता असलेली प्रमाणपत्रे स्वत:जवळ घेऊन ठेवावीत.
n घरात किरायाने राहणाऱ्या व्यक्तींची माहिती लगतच्या पोलीस ठाण्यालाही द्यावी.
न्यायालयातही मागताहेत दाद
किरायादारानेच घरावर हक्क सांगितल्यानंतर अशा प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होतात.
पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करूनही उपयोग झाला नाही, तर अनेक जण न्यायालयात धाव घेतात.
त्यामुळे स्वत:च्याच हक्काच्या घराचा ताबा मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत.
अशा प्रकरणात न्यायालयातील दाखल तक्रारींचा आकडा मात्र समजू शकला नाही.
अनेकांनी गुंतवणुकीसाठी प्लॉट, घर घेतलेेले असते. हे घर नीटनेटके राहावे, यासाठी किरायाने दिले जाते. घरमालक इतर गावांत असल्याने त्या घरावर ताबा सांगण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.