उमेदवारांची घरपट्टी,पाणीपट्टी भरताना पॅनल प्रमुखांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:09 AM2020-12-28T04:09:47+5:302020-12-28T04:09:47+5:30

तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींतून ३३९ सदस्य निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांना घरपट्टी व पाणीपट्टी पूर्ण ...

Candidates' house rent, panel chief's suffocation while filling water bill | उमेदवारांची घरपट्टी,पाणीपट्टी भरताना पॅनल प्रमुखांची दमछाक

उमेदवारांची घरपट्टी,पाणीपट्टी भरताना पॅनल प्रमुखांची दमछाक

Next

तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींतून ३३९ सदस्य निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांना घरपट्टी व पाणीपट्टी पूर्ण भरलेली असणे अनिवार्य आहे. तसेच त्यांच्याकडे शौचालय असणे अनिवार्य आहे. उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरतानाच त्यांना घरपट्टी व पाणीपट्टी थकीत नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्ष्यांचा पाहिजे तेवढा हस्तक्षेप नसतो. गावातीलच स्थानिक पुढारी पॅनेल उभे करून निवडणूक लढवितात. निवडून येण्याची पात्रता असलेला उमेदवार आपल्याच पॅनलमध्ये आणण्यासाठी पॅनल प्रमुखांची धडपड सुरू असते. सद्य:स्थितीत गावागावात पॅनल उभे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो व त्याला पॅनलमध्ये कसे आणायचे याची मोर्चेबांधणी पॅनल प्रमुखांकडून सुरू आहे. पॅनलमध्ये असणाऱ्या उमेदवाराकडे घरपट्टी व पाणीपट्टी थकीत आहे. त्यामुळे ती भरण्याची जबाबदारी पॅनल प्रमुखावर येऊन पडली आहे. ७ सदस्य असलेल्या गावांत ७० ते ८० हजार तर ९ पेक्षा जास्त सदस्य असलेल्या गावांत १ लाखाच्या वर घरपट्टी व पाणीपट्टी भरावी लागत आहे. यासोबतच पॅनलमधील उमेदवारांचा खर्चही पॅनल प्रमुखांनी करावा, असा आग्रह उमेदवारांकडून धरला जातो. गावातील ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असते. यामुळे या निवडणुकीत पॅनल प्रमुखांना लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. गावात आपले पॅनल निवडून यावे यासाठी पॅनल प्रमुख जोरदार तयारी करत असल्याचे चित्र तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये दिसून येत आहे.

शौचालय स्वयंघोषणा पत्राचा निव्वळ फार्स

ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांना घरात शौचालय असल्याबाबतचे स्वयंघोषणा पत्र द्यावे लागते. यामध्ये उमेदवार मालकीच्या घरात राहत असून शौचालय आहे. शौचालयाचा वापर करतो. तसेच भाड्याच्या घरात राहत असून घरात शौचालय आहे व त्याचा नियमित वापर करतो. घरात शौचालय नाही मात्र सार्वजनिक शौचालयाचा वापर करतो. असे लिहून द्यावे लागत आहे. उमेदवारांनी काही लिहून दिले तरी त्याची तपासणी किंवा चौकशी संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शौचालयाची सोय घोषणापत्र निव्वळ निवडणुकीत फार्स ठरत आहे.

सोमवारपासून अर्ज दाखल करण्यासाठी होणार गर्दी

तालुक्यात २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी २३ आणि २४ डिसेंबर या दोन दिवसांत तालुक्यात केवळ २ अर्ज दाखल झाले आहेत. २५,२६,२७ डिसेंबर रोजी सुटी आल्याने इच्छुक उमेदवारांना २८, २९, ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. यामुळे या तीन दिवसांत तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार आहे.

Web Title: Candidates' house rent, panel chief's suffocation while filling water bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.