कागदपत्रांची पूर्तता करताना उमेदवारांचा जीव मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:15 AM2020-12-29T04:15:24+5:302020-12-29T04:15:24+5:30

निवडणुकीची घोषणा झाली असताना नवनवीन शासन आदेश निघत आहेत. कमी वेळात अधिक कामे करावी लागत असल्याने इच्छुक उमेदवार जेरीस ...

Candidates' lives are exhausted while completing the paperwork | कागदपत्रांची पूर्तता करताना उमेदवारांचा जीव मेटाकुटीला

कागदपत्रांची पूर्तता करताना उमेदवारांचा जीव मेटाकुटीला

googlenewsNext

निवडणुकीची घोषणा झाली असताना नवनवीन शासन आदेश निघत आहेत. कमी वेळात अधिक कामे करावी लागत असल्याने इच्छुक उमेदवार जेरीस येत आहेत. बॅकेत खाते काढून त्याची झेराॅक्स काॅपी देणे, ग्रामपंचायतीचा कर थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र, पाणीपट्टी बेबाकी प्रमाणपत्र, शौचालय असल्याचे ग्रामपंचायती ठरावासह प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचा कंत्राटदार नसल्याचे प्रमाणपत्र, दोनपेक्षा अधिक अपत्ये नसल्याचे प्रमाणपत्र, १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांना सातवी पासचा दाखला, शपथपत्राद्धारे हमीपत्र, गुन्हा दाखल किवा न्यायालयात शिक्षा नसल्याचे प्रमाणपत्र, नावावर असलेली संपत्ती व मालमत्तेचे घोषणा पत्र, रहिवासी असल्याचे घोषणापत्र, विवाहित महिलेस माहेर व सासरच्या नावाची एकच व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र, राखीव जागेवर असलेल्या उमेदवारांना जातवैधता वेळेत देण्याचे हमीपत्र अशा विविध प्रमाणपत्रांसाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ होत आहे. बॅकेत एकाच दिवशी खाते उघडता येत नसल्याने बँकेच्या चकरा अधिक होत आहेत. छाननीत आपला अर्ज बाद होऊ नये व आक्षेप घेण्यास संधीच मिळू नये म्हणून आवश्यक कागदपत्रे जमा करताना इच्छुक उमेदवार जेरीस येत आहेत.

Web Title: Candidates' lives are exhausted while completing the paperwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.