उमेदवारांना द्यावी लागणार दैनिक खर्चाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:22 AM2020-12-30T04:22:43+5:302020-12-30T04:22:43+5:30

सेलू तालुक्यातील ८२ पैकी मुदत संपलेल्या ६७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ५१९ सदस्य निवडण्यासाठी २०५ वार्डात ही निवडणूक ...

Candidates will have to provide information on daily expenses | उमेदवारांना द्यावी लागणार दैनिक खर्चाची माहिती

उमेदवारांना द्यावी लागणार दैनिक खर्चाची माहिती

Next

सेलू तालुक्यातील ८२ पैकी मुदत संपलेल्या ६७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ५१९ सदस्य निवडण्यासाठी २०५ वार्डात ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी आता केवळ एक दिवसाचा कालावधी शिल्लक असल्याने उमेदवरांचा शोध घेणे, बँक खाते उघडणे, इतर आवश्यक माहिती संकलित करणे आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पॅनलप्रमुखांची कसरत होत आहे. पॅनलप्रमुखांसह गावातील राजकीय मंडळींचा नेट कॅफेवर मुक्काम होत आहे. एकंदरित सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करताना मात्र पॅनलप्रमुखांची दमछाक होत आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे जात वैधतेसाठी प्रस्ताव तयार करण्यातही बराच वेळ जात असून महिला राखीव जागांबाबतीत जात वैधतेसाठी माहेरकडील अभिलेखाचे पुरावे लागत असल्याने एकच धावपळ उडत आहे. दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरल्यापासून उमेदवारांना दैनिक खर्चाचा तपशिल खर्च तपासणी करणाऱ्या पथकास सादर करावा लागणार आहे. यासाठी सर्व उमेदवारांचे स्वतंत्र बँकेत खाते उघडण्यात येत आहेत. तसेच निकालापासून ३० दिवसाच्या आत खर्चाच्या तपशिलाबाबत अंतीम शपथपत्र सादर करावे लागणार आहे. मुदतीत खर्च दाखल न करणारे सदस्य अपात्र होऊ शकतात, अशी तरतूद निवडणूक आयोगाने केली आहे.

९२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

तालुक्यात प्रशासनाने जवळपास २३० पथक नियुक्त केले असून एका पथकात मतदान केंद्राध्यक्ष व ३ मतदान कर्मचारी असा ४ जणांचा सामावेश आहे. यासर्व कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण २९ डिसेंबर रोजी साईनाट्यगृहात पार पडले. ६ जानेवारी रोजी या कर्मचाऱ्यांना दुसरे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

Web Title: Candidates will have to provide information on daily expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.