पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:15 AM2021-01-17T04:15:39+5:302021-01-17T04:15:39+5:30
अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व त्यांचे पथक बोरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रा जवळ आलेले असताना सायंकाळी ...
अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व त्यांचे पथक बोरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रा जवळ आलेले असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास परिसरातील जमाव हटवत होते. तेव्हा तेथील अजिंक्य विजय चौधरी, पिंटू चौधरी (रा. बोरी), गुलमीर खान पठाण, अमन खान (रा. परभणी) व इतर दोन ते तीन लोक बेकायदेशीर जमाव करून उभे होते. तेव्हा पोलीस शिपाई गजानन रोकडे यांनी तुम्ही इथे का थांबलात, असे विचारले असता, अजिंक्य विजय चौधरी यांनी तुम्हाला काय करायचे आहे. तुम्ही मला ओळखत नाही, असे म्हणून शिवीगाळ करून, ड्युटीवर असलेल्या रोकडे यांचे पोलीस गणवेशाची कॉलर हातांनी पकडून छातीत मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलीस शिपाई गजानन क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सात आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, यासह वेगवेगळ्या कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.