वाळूच्या टिप्परसह देशी दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:16 AM2021-03-14T04:16:50+5:302021-03-14T04:16:50+5:30
पूर्णा शहरातील तहसील कार्यालयासमोर वाळूने भरलेला एक टिप्पर उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला, तेव्हा एम. ...
पूर्णा शहरातील तहसील कार्यालयासमोर वाळूने भरलेला एक टिप्पर उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला, तेव्हा एम. एच. ४३/ ई ०७९४ या टिप्परमध्ये वाळू असल्याचे निदर्शनास आले. चालक राजेश दिगंबर जोंधळे (रा. हरिनगर, पूर्णा) व वाहनाचे मालक गोविंद वैजनाथ शिंदे (रा.बरबडी, ता. पूर्णा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १३ मार्च रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलीस कर्मचारी दीपक मुदिराज यांच्या फिर्यादीवरून राजेश जोंधळे व गोविंद शिंदे या दोघांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत ६ लाख रुपयांचा टिप्पर आणि १२ हजारांची वाळू असा ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
त्याचप्रमाणे परभणी शहरात दारू जप्त करण्यात आली आहे. १२ मार्च रोजी जिल्हा स्टेडियम परिसरातून वकील कॉलनीकडे एक ऑटोरिक्षा बेकायदेशीररित्या दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी हा ऑटो थांबविला. चालक आकाश गंगाधर चित्ते यास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून दारूच्या बाटल्या व ऑटोरिक्षा असा ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी यशवंत वाघमारे यांच्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.