सेलूत पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:32 AM2021-02-21T04:32:44+5:302021-02-21T04:32:44+5:30
येथील स्टेशन रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे महिलांचे हस्ते प्रारंभी औक्षण व पूजन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात ...
येथील स्टेशन रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे महिलांचे हस्ते प्रारंभी औक्षण व पूजन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी डॉ. भास्कर शिंदे व सच्चिदानंद डाखोरे यांच्या संचाने जिजाऊ वंदना गायिली. त्यानंतर महिला भगिनींनी शिवरायांचा पारंपरिक पाळणा घेऊन मुख्य सोहळा पार पडला. कोरोना संकटामुळे मर्यादित शिवप्रेमींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व दिमाखदार पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात आला. पुतळा परिसरात डौलाने फडकणारे भगवे ध्वज, पाना-फुलांची आकर्षक सजावट, महिलांनी परिधान केलेले भगवे फेटे, आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली होती. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सर्जेराव लहाने, सचिव राम मैफल, रामराव बोबडे, रामराव गायकवाड, इंजि. भास्करराव कोलते, बजरंग आरकुले, माधव गव्हाणे, रामेश्वर शेरे, शरद ठाक्कर, तुकाराम मगर, शरद मगर, प्रा. राजाराम झोडगे, एकनाथ जाधव, नाना पवार, शशांक टाके, कष्णा रोडगे, विशाल गव्हाडे, संतोष शिंदे, अमोल गायकवाड, सोपान ढेंगळे, नीलेश शिंदे, राहुल शेरे, महेश शेरे, आदींची उपस्थिती होती.