शिवरायांच्या जयघोषात जयंती महोत्सव जल्लोषात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:49 AM2021-02-20T04:49:16+5:302021-02-20T04:49:16+5:30

परभणी : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जिल्हाभरात जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. ...

In the celebration of the birth anniversary of Shivaraya | शिवरायांच्या जयघोषात जयंती महोत्सव जल्लोषात

शिवरायांच्या जयघोषात जयंती महोत्सव जल्लोषात

Next

परभणी : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जिल्हाभरात जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. तसेच प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.

परभणी शहरात सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दिवसभर विविध मान्यवरांनी येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. सकाळी ८.३० वाजता महापौर अनिताताई सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, मनपा आयुक्त देवीदास पवार, माजी सभापती रवि सोनकांबळे, नगरसेवक सचिन देशमुख, सुभाष जावळे यांनी अभिवादन केले. त्यानंतर जि. प. अध्यक्ष निर्मलाताई विटेकर, भाजपाचे महानगराध्यक्ष आनंदराव भरोसे यांनी अभिवादन केले. सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींनी अभिवादन केले. सावता सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे, मंगेश सेानुने, जिल्हाध्यक्ष राम जाधव, रवि डुबे, सुभाष गायकवाड, बंटी साबने, बाळासाहेब लंगोटे, विनोद अंबोरे आदींनी अभिवादन केले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, गजानन जोगदंड, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल भुसारे, गोरख मोहिते, माणिक शिंदे, रंगनाथ मोहिते, अनिल जाधव, भय्या मोहिते, प्रितम पैठणे, रोहन काळे आदींनी अभिवादन केले. सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे किशोर रणेर, विठ्ठल तळेकर आदींनी अभिवादन केले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विभागीय प्रवक्ता डॉ. धर्मराज चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष संपत नंदनवरे, शेषराव जल्हारे, अशोक वायवळ, राजेश बालटकर, संजय औदडे, पवार आदींनी अभिवादन केले. याशिवाय दिवसभर या परिसरात शहरातील विविध भागांतून दुचाकी, सायकल रॅलीद्वारे येऊन अनेकांनी अभिवादन केले. दिवसभर हा परिसर गजबजला होता.

शहरातून जल्लोषात मिरवणूक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने सायंकाळी ५ वाजता शहरातील शनिवार बाजार भागातून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. ही मिरवणूक नानलपेठ, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशन रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात रात्री दाखल झाली. मिरवणुकीत झांज पथक, सजीव देखावा, ढोल पथक आदी होते. यावेळी चित्तथरारक कसरती दाखविण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघाेषाने शहराचा परिसर दुमदुमून गेला होता. या मिरवणुकीत वारकरी मंडळाचीही उपस्थितीही लक्षणीय होती.

Web Title: In the celebration of the birth anniversary of Shivaraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.