सेलू उपजिल्हा रुग्णालयास ५० खाटांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:12 AM2020-12-27T04:12:51+5:302020-12-27T04:12:51+5:30

सेलू येथील ग्रामीण रुग्णालयास सेलू शहर व तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९३ गावातील रुग्ण सेवेचा भार लक्षात घेता ...

Cellu sub-district hospital needs 50 beds | सेलू उपजिल्हा रुग्णालयास ५० खाटांची गरज

सेलू उपजिल्हा रुग्णालयास ५० खाटांची गरज

googlenewsNext

सेलू येथील ग्रामीण रुग्णालयास सेलू शहर व तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९३ गावातील रुग्ण सेवेचा भार लक्षात घेता तत्कालीन आरोग्य मंत्री दिवगंग विमल मुंदडा यांनी येथील ३० खाटांत आणखी २० खाटांची वाढ करीत या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात २१ फेब्रुवारी २००५ रोजी रुपांतरित केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी ९ ऑगस्ट २०१६ रोजी पदभार घेतल्यापासून या रुग्णालयात सुविधा व रुग्णसेवेत कमालीचा कायापालट झाला आहे. चालू वर्षभरात या रुग्णालयात कुटुंब कल्याणच्या ४१७ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. नैसर्गिक प्रसुती ६०२ महिलांची झाली असून, ११८ महिलांची सिझरियनच्या माध्यमातून प्रसुती करण्यात आली. आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या वर्गातील महिला प्रसुतीकरीता या उपजिल्हा रुग्णालय जवळ करतात. त्याचबरोबर दररोज किमान ३०० रुग्णांना ओपीडीच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा दिली जाते. कोरोनाच्या महामारीतही अद्यायवत कोविड सेंटरमधून २८० कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले. येथील तत्पर रुग्णसेवेमुळे रुग्णसंख्येत मागील सहा महिन्यात मोठी वाढ झाली आहे. परंतु, त्या प्रमाणात खाटांची संख्या मात्र वाढली नाही. ती आजही ५० एवढीच आहे. त्यामुळे मुंबई येथील आरोग्य संचालनालयाकडे प्रलंबित असलेला ५० खाटांचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करून हे रुग्णालय १०० खाटांचे करावे, अशी मागणी सेलूकरांमधून होत आहे.

रुग्ण सेवेबरोबरच सोयीसुविधाही

सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेबरोबरच रुग्णालय परिसरात बाग, घनवन प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथील नियोजन व रुग्णसेवेची दखल घेवून शासनाने या उपजिल्हा रुग्णालयात विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्याचबरोबर या ठिकाणची कार्यपद्धती पाहण्यासाठी जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी भेट देवून माहिती घेतात.

Web Title: Cellu sub-district hospital needs 50 beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.