पहाटे पाच वाजताच सीईओ पोहोचले गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:41 AM2021-01-13T04:41:28+5:302021-01-13T04:41:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगल्या आरोग्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी शौचालयाचा नियमित वापर करावा, या उद्देशाने ...

The CEO reached the village at five in the morning | पहाटे पाच वाजताच सीईओ पोहोचले गावात

पहाटे पाच वाजताच सीईओ पोहोचले गावात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगल्या आरोग्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी शौचालयाचा नियमित वापर करावा, या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी तालुक्यातील पिंगळी या गावात पहाटे पाच वाजताच हजेरी लावत नागरिकांना आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक रविवारी पहाटे ५ वाजता परभणी तालुक्यातील पिंगळी बाजार या ग्रामपंचायतीमध्ये पोहोचले. हागणदारीच्या मार्गावर थांबून या पथकाने उघड्यावर जाणाऱ्या ग्रामस्थांना शौचालय वापराबाबतची माहिती पुस्तिका देऊन त्यांना शौचालयाचा नियमित वापर करण्याची विनंती केली. जर विनंती करूनही काही नागरिक ऐकत नसतील तर अशांना ५०० रुपयांचा दंड करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. यानंतर गावाच्या चारही प्रमुख रस्त्यांच्या ठिकाणी जाऊन गुड मॉर्निंग पथकाने नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. गावातून स्वच्छता फेरी काढून नळ जोडण्यांची पाहणी करून पाणी बचतीबाबत टाकसाळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी टाकसाळे म्हणाले, उघड्यावर शौचाला गेल्यामुळे महिलांना पोटाचे आजार बळावत आहेत, माणसाचे आरोग्यमान कमी होऊन येणारी पिढीही रोगट होण्यास कारणीभूत ठरत आहे. तसेच माशांमार्फत, दूषित पाण्यातून, खाण्यातून अनेक रोग उद्भवत आहेत. नागरिकांनी टी. व्ही., मोबाईल, गाडी अशा चैनीच्या वस्तूंपेक्षा शौचालयाचे बांधकाम आणि त्याच्या नियमित वापरावर भर देणे महत्त्वाचे असल्याचे टाकसाळे यांनी सांगितले.

यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता गंगाधर यंबडवार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, परभणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनुप पाटील, सरपंच जगन्नाथ गरुड, उपसरपंच अनंत गरुड, ग्रामसेवक तुकाराम साके, आशासेविका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होत्या.

Web Title: The CEO reached the village at five in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.