परभणी जिल्हा कचेरीवर चर्मकार समाजाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:11 AM2018-09-15T00:11:19+5:302018-09-15T00:11:53+5:30
येथील चर्मकार क्रांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. चर्मकार क्रांती मोर्चाचे पदाधिकारी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात जमले. येथून घोषणाबाजी करीत हे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दाखल झाले. तेथे घोषणाबाजी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील चर्मकार क्रांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
चर्मकार क्रांती मोर्चाचे पदाधिकारी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात जमले. येथून घोषणाबाजी करीत हे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दाखल झाले. तेथे घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. त्यामध्ये भारतीय संविधानाची प्रत जाळणाºयावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, संबंधित आरोपींना कठोर शासन करावे, संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुटी जाहीर करावी, चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी स्व.बाबु जगजीवनराम यांच्या नावाने आयोग स्थापन करावा, संत रोहिदास चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळाचे सर्व कर्ज माफ करावे, महामंडळास नवीन भागभांडवल उपलब्ध करुन द्यावे, महामंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना बिनव्याजी १० लाख रुपयांचे कर्ज देण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा संघटक नरहरी सोनवणे, माधव गायकवाड, प्रकाश गोरे, सुरेश लोकरे, मुंजा शिंदे, इंद्रजीत धोंडगे, महादू शिंदे, बाळासाहेब ठोंबरे, ज्ञानेश्वर आवचार, सुखदेव घोंडगे, बाबासाहेब वानखेडे, रामकिशन कांबळे, प्रल्हाद हाळंबे, बाबाराव वानखेडे, दत्ता शिंदे, गंगाधर शिंदे, अंकुश जोगदंड आदींची उपस्थिती होती.