परभणीत छगन भुजबळ यांचा आरोप : नरेंद्र मोदी यांचे सरकार ठरले ‘फेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:56 AM2019-01-24T00:56:08+5:302019-01-24T00:56:18+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटाबंदी फेल ठरली़ जीएसटी फेल ठरली, स्टार्टअप इंडिया योजना फेल ठरली, डिजिटल इंडिया योजना फेल ठरली, कर्जमाफीची घोषणा फेल ठरली, उज्ज्वला गॅस योजना फेल ठरली एवढेच नव्हे तर केंद्रातील मोदी सरकारच फेल ठरले असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला़

Chhagan Bhujbal's allegation: Narendra Modi's government 'failed' | परभणीत छगन भुजबळ यांचा आरोप : नरेंद्र मोदी यांचे सरकार ठरले ‘फेल’

परभणीत छगन भुजबळ यांचा आरोप : नरेंद्र मोदी यांचे सरकार ठरले ‘फेल’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटाबंदी फेल ठरली़ जीएसटी फेल ठरली, स्टार्टअप इंडिया योजना फेल ठरली, डिजिटल इंडिया योजना फेल ठरली, कर्जमाफीची घोषणा फेल ठरली, उज्ज्वला गॅस योजना फेल ठरली एवढेच नव्हे तर केंद्रातील मोदी सरकारच फेल ठरले असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला़
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘निर्धार परिवर्तनाचा’ ही संपर्क यात्रा बुधवारी जिंतूर येथे दाखल झाली़ यावेळी भुजबळ बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ़ विक्रम काळे, आ़ विजय भांबळे, आ़ बाबाजानी दुर्राणी, माजी खा़ सुरेश जाधव, माजी खा़ गणेश दुधगावकर, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, माजी मंत्री फौजिया खान, राजेश विटेकर, संतोष बोबडे, स्वराजसिंह परिहार, भावनाताई नखाते, सभापती अशोक काकडे, सारंगधर महाराज आदींची उपस्थिती होती़ यावेळी अर्ध्या तासाच्या भाषणात भुजबळ यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली़ राफे ल विमान घोटाळा झाला़ मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा झाला, राजस्थानातही घोटाळा झाला़ त्यामुळे हे घोटाळेबाज सरकार जनतेने २०१९ च्या निवडणुकीत हटवावे, असे आवाहन केले़ हे सरकार प्रत्येकाचा आवाज दडपत आहे़ जाती-जातीमध्ये व धर्मा-धर्मामध्ये वाद निर्माण करीत आहे़, असा आरोपही त्यांनी यावेळी केला़ यावेळी धनंजय मुंडे यांनीही मार्गदर्शन केले़
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे फक्त काही वेळच सभेला उपस्थित राहिले़ परंतु, गंगाखेडच्या सभेला उशीर होत असल्यावरून ते भाषण न करताच निघून गेले़ यावेळी जि़प़ सदस्य अजय चौधरी, रामराव उबाळे, बाळासाहेब घुगे, नानासाहेब राऊत, कपिल फारुखी, उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळे, तालुकाध्यक्ष मनोज थिटे, अ‍ॅड़ विनोद राठोड आदींची उपस्थिती होती़ यावेळी ग्रामीण भागातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला़
व्हिडिओ क्लिपद्वारे जयंत पाटील यांनी केला मोदी सरकारचा पंचनामा
गंगाखेड- येथील जाहीर सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ़ जयंत पाटील यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची क्लिप दाखवून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? बेरोजगार तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकºया मिळाल्या का? १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा झाले का? महागाई कमी झाली का? काळे धन परदेशातून परत आले का? अच्छे दिन आले का? असे अनेक प्रश्न उपस्थितांना विचारले़ शिवाय भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची १५ लाखांच्या घोषणेबाबतची ‘चुनावी जुमला’ होता ही क्लिपही दाखवित मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले़ यावेळी धनंजय मुंडे, छगन भुजबळ, आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे आदींनी मार्गदर्शन केले़ यावेळी माजी खा़ सुरेश जाधव, ज्ञानोबा गायकवाड, राजेश विटेकर, मिथिलेश केंद्रे, मारोती बनसोडे, शंकर वाघमारे, रत्नाकर शिंदे, लिंबाजी देवकते, माधव भोसले, शहाजी देसाई, वसंत सिरसकर, सय्यद अकबर, सुनील चौधरी आदी हजर होते़
धनगर आरक्षणावरून घोषणाबाजी
यावेळी धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांचे भाषण सुरू असताना धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी व्यासपीठाच्या बाजूला असलेल्या युवकांकडून घोषणाबाजी सुरू होती़ यावेळी भुजबळ यांनी घोषणाबाजी करणाºया युवकांना आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले़ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी पहिल्या केबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे घोषित केले होते़ परंतु, ते काहीही करू शकले नाहीत़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी धनगर समाज बांधवांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला़
परभणी लोकसभेचा उमेदवार एकत्र बसून ठरवू
यावेळी बोलताना धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांनी परभणी लोकसभा मतदार संघाचा पक्षाचा उमेदवार एकत्र बसून ठरवूत़ उमेदवारी कोणालाही मिळाली तरी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचाच विजय झाला पाहिजे़ या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे सांगितले़ तर आ़ भांबळे यांनी पक्ष ज्यांना उमेदवारी देईल, त्यांना जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक लीड देऊ, अशी घोषणा केली़
जाधवांचे संसदेतील भाषण दाखवा; ५ लाख बक्षीस देतो
यावेळी बोलताना आ़ विजय भांबळे यांनी खा़ बंडू जाधव यांच्यावर जोरदार टीका केली़ या संदर्भातील एका वृत्ताचा हवाला देत ते म्हणाले की, जाधव हे संसदेत न बोलणारे खासदार आहेत़ त्यांनी कधीही सभागृहात भाषण केले नाही़ ज्या प्रमाणे धनंजय मुंडे, आम्ही सभागृहात बोलतो, त्याबाबतच्या क्लिप आहेत़ तसे खा़ जाधव यांची सभागृहातील भाषणाची एक तरी क्लिप दाखवा, त्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस देतो, अशी घोषणा केली़ भावनेच्या आहारी जाऊन गेल्या वेळी मतदारांनी चूक केली़ यावेळी मात्र चूक करू नका, असेही ते म्हणाले़ माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांचा नामोल्लेख टाळून भांबळे यांनी त्यांच्यावरही टीका केली़ पीकविमा घोटाळ्याच्या ८ कोटींचा हिशोब द्या, असे सांगून उपस्थितीतांना तुम्ही हा घोटाळा विसरलात का, असा सवाल केला़ २५ वर्षांत त्यांनी रस्त्यावरील एक खड्डाही बुजविला नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Chhagan Bhujbal's allegation: Narendra Modi's government 'failed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.