बालकाचा टेंपोच्या धडकेत मृत्यू; चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:20 PM2018-05-03T17:20:05+5:302018-05-03T17:20:05+5:30
मानवतरोड येथील रेल्वे फाटकावर टेंपोने धडक दिल्याने बुधवारी (दि.२) १२ वर्षाचा एक मुलगा जागीच ठार झाला होता. या बालकाच्या नातेवाईकांनी आज सकाळी मानवत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत टेंपो चालकासह मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मानवत (परभणी ) : तालुक्यातील मानवतरोड येथील रेल्वे फाटकावर टेंपोने धडक दिल्याने बुधवारी (दि.२) १२ वर्षाचा एक मुलगा जागीच ठार झाला होता. या बालकाच्या नातेवाईकांनी आज सकाळी मानवत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत टेंपो चालकासह मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
राष्ट्रीय महामार्गावर मानवत रोड रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या रेल्वे फाटका जवळ २ मे रोजी झालेल्या अपघातात विशाल पवार या १२ वर्षीय बालकाचा मृत्यु झाला होता. तर त्याचे वडील साईनाथ पवार हे जखमी झाले आहेत. विशाल याचा मृत्यू झाल्याने पवार कुंटुबातील संतप्त शेकडो नातेवाईकांनी आज सकाळी साडे दहा वाजता पोलीस ठाणे गाठत टेंपो चालक व मालक दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक प्रदिप पालिवाल यांनी गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्या नंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्याचा ताबा सोडला.
यावेळी भारत पवार, मुरकी पवार, रंगनाथ काळे गोरख काळे, आरुण कांबळे मचिद्र काळे, श्रावण काळे सुंदर पवार, आसाराम पवार, गणेश पवार, रावसाहेब काळे, बापु काळे, सुर्यभान पवार, राजेभाउ का ळे, धोंडीराम पवार, अशोक पवार, यांच्यासह अदी नातेवाईक उपस्थित होते.
पारधी, आदिवासी सेवा विकास परिषदेचे निवेदन
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याऱ्या टेंपो चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अदिवासी, पारधी विकास परिषदेने पोलीस निरीक्षक प्रदिप पालिवाल यांच्याकडे केली. निवेदनावर जिल्हा अध्यक्ष मधुकर काळे, ग्रामिण जिल्हा अध्यक्ष भारत पवार, उपाध्यक्ष राजाराम काळे, महासचिब शिवाजी पवार, सेलु तालुका अध्यक्ष रंगनाथ काळे, मानवत तालुका अध्यक्ष सुंदर पवार, श्रावण काळे, राम पवार यांच्या स्वाक्षरी आहेत.