परभणीत बालविवाहाचे प्रमाण जास्त; पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात: रूपाली चाकणकर

By राजन मगरुळकर | Published: October 1, 2022 03:14 PM2022-10-01T15:14:49+5:302022-10-01T15:15:10+5:30

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात शनिवारी आढावा बैठक झाली.

Child marriage is high in Parbhani district; Police should take effective measures: Rupali Chakankar | परभणीत बालविवाहाचे प्रमाण जास्त; पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात: रूपाली चाकणकर

परभणीत बालविवाहाचे प्रमाण जास्त; पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात: रूपाली चाकणकर

googlenewsNext

परभणी : जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण जास्त असल्याने पोलिस दलाने बालविवाह रोखण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करुन जनजागृती करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिल्या.

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात शनिवारी आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, महिला व बालविकास विभाग अधिकारी कैलास तिडके, महिला व बालविकास अधिकारी विशाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

चाकणकर म्हणाल्या, बालविवाह ही सामाजिक समस्या आहे. बालविवाहामुळे मुलींचा पूर्ण विकास होण्यापूर्वीच त्यांच्यावर मातृत्वाची जबाबदारी येऊन पडते. बालविवाह रोखण्यासाठी पोलिस दलाने प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात. गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा वर्कर आणि अंगणवाडीताई यांच्या माध्यमातून होणारे बालविवाह रोखण्यात यावे. तसेच रविवारी आयोजित केलेल्या ग्रामसभेत बालविवाह रोखणे व विधवा प्रथा बंदीचा ठराव घेण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच पोलिस दलाच्या माध्यमातून जनजागृती करावी. पोलिस ठाण्यात कार्यरत भरोसा सेलच्या माध्यमातून पिडित महिलांना दिलासा देण्याचे काम करावे. पतीला किंवा सासरच्या लोकांना नोटीस देण्याचा कालावधी शक्य होईल तेवढा कमी करावा. तसेच नोटीस दिल्यावर संबंधित उपस्थित राहत नसेल, तर संबंधितावर तत्काळ गुन्हे दाखल करावेत. 

जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरणांच्या इमारतीमध्ये समुपदेशन केंद्र सुरु करुन त्याठिकाणी पिडीत महिलांचे समुपदेशन करावेत. भरोसा सेलकडे येणाऱ्या महिलांना किमान कौशल्य विकास विभाग किंवा माविमच्या सहकार्याने प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच महिला व बालविकास विभागाने अशा महिलांसाठी ‘स्वाधार गृह’ प्रस्ताव सादर करावेत. अध्यक्षा चाकणकर यांनी कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, बाल विवाह, पीसीपीएनडीटी व महिलांसंबंधी असलेल्या विविध प्रकरणांबाबत आढावा घेतला. भरोसा सेल, निर्भया पथक यांची देखील पाहणी केली. जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाने तयार केलेल्या पुस्तिकेचे विमोचन चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. बैठकीस महिला आणि पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.

या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार 
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते निर्भया पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला गाडेकर, शेख रहिमा, करुणा मालसमिंदर, त्रिवेणी चोपडे, अंतलका फुफाटे, किर्ती पानगे तर सिमा चाटे, शकुंतला एकाडे, वंदना चव्हाण, संघमित्रा होळकर, आशा लांडगे, शबाना शेख, नागेंद्र मोळके, कृष्णा मुंढे, संजय शेळके, मुकुंद लाड, मधुकर चट्टे आणि शिवाजी घुगे या कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

Web Title: Child marriage is high in Parbhani district; Police should take effective measures: Rupali Chakankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.