बालसुलभ खेळ पडले बाजूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:15 AM2020-12-29T04:15:31+5:302020-12-29T04:15:31+5:30

अवैध वाळू उपसा वाढला गंगाखेड : येथील उपविभागीय महसूल विभागाअंतर्गत येत असलेल्या गोदावरी नदीच्या वाळूपट्ट्यात अवैध वाळू उपसा होत ...

Childish games fell aside | बालसुलभ खेळ पडले बाजूला

बालसुलभ खेळ पडले बाजूला

Next

अवैध वाळू उपसा वाढला

गंगाखेड : येथील उपविभागीय महसूल विभागाअंतर्गत येत असलेल्या गोदावरी नदीच्या वाळूपट्ट्यात अवैध वाळू उपसा होत आहे. वाळू उपशाची अवैध तस्करी रोखण्यात महसूल प्रशासनाला अपयश येत आहे. उपविभागीय महसूल कार्यालय, तहसील कार्यालयाने वाळू तस्करांना प्रतिबंधक करून कार्यवाही करावी. अवैध वाळू उपशावर रोख लावून महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

फिरत्या पशुरुग्णवाहिकेची सोय करावी

गंगाखेड : तालुक्यातील आजारी पशुरुग्णावर उपचार करण्यासाठी फिरती पशुरुग्णवाहिकेची सोय करण्यात यावी. बैल, गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदी जनावरांना आजार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. फिरत्या पशुरुग्णवाहिकेत जनावरांना कोणता आजार झाला याचे निदानाची सोय, शस्त्रक्रिया आदींची किमान सोय असावी. अनेक वेळा पशुपालकांना दुर्गम भागातून रोगी जनावरांना पायी चालवत आणता येत नाही. आजाराने अशक्त जनावरांना चालणे मुश्कील होते. टेम्पोत आजारी जनावर पशू दवाखान्यात आणण्यासाठी वाहनभाडे पशुपालकांना परवडत नाही. पशुपालकांच्या घरापर्यंत नेण्यासाठी फिरते पशुरुग्णवाहिका सुरू कारावी, अशी आपेक्षा पशुपालकांतून होत आहे.

लांब पल्ल्याच्या बस चालू करण्याची मागणी

सोनपेठ : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे हळूहळू एसटी बस पूर्वपदावर होत आहेत. त्यामुळे तालुक्यातून औरंगाबाद, नांदेड, पंढरपूर, हिंगोली, बीड, जालना यासह मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी बस नाहीत. त्यामुळे सोनपेठ येथून लांब पल्ल्याच्या बस चालू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Web Title: Childish games fell aside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.