धूळ वाढल्याने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:11 AM2020-12-07T04:11:36+5:302020-12-07T04:11:36+5:30
बाजारपेठेत गर्दी कायम परभणी : शहरातील बाजारपेठ भागात दररोज ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण झाला ...
बाजारपेठेत गर्दी कायम
परभणी : शहरातील बाजारपेठ भागात दररोज ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे नागरिक काळजी घेण्याचे टाळत असून, पूर्वीप्रमाणेच बिनधास्तपणे बाजारपेठेत वावरत आहेत. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बसपोर्टच्या कामाला लागेना मुहूर्त
परभणी : शहरातील बसस्थानक भागात बसपोर्ट उभारणीचे काम सुरू केले आहे. मात्र, निधीअभावी हे काम सध्या ठप्प पडले आहे. त्यामुळे बसपोर्टचे काम वेळेत पूर्ण होईल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. शहरवासियांसाठी बसपोर्ट हा जिव्हाळ्याचा विषय असून, महामंडळ प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
एसटीच्या उत्पन्नात वाढ
परभणी : येथील एस. टी. महामंडळाने पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू केली असून, एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. प्रमुख रेल्वे मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या मर्यादित स्वरुपाची आहे. त्यामुळे प्रवाशांचा ओढा एस.टी. महामंडळाकडे वाढला आहे. परिणामी एस.टी.च्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.
रस्ता जागोजागी उखडला
परभणी : येथील पारदेश्वर मंदिरापासून ते जुन्या पॉवर हाऊसकडे जाणारा रस्ता जागोजागी उखडला आहे. त्यामुळे या मार्गावरुन वाहतूक करताना अक्षरश: कसरत करावी लागते. शहरात सध्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. तेव्हा या रस्त्याचीही दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
सुविधांअभावी गैरसोय
परभणी : येथील बसस्थानक परिसरात प्रवाशांना मुबलक सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. सध्या तात्पुरत्या शेडमध्ये प्रवाशांसाठी थांबण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या सुविधांसाठी प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.