‘स्वच्छ परभणी’ मोहीम झाली व्यापक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:37 AM2017-12-28T00:37:58+5:302017-12-28T00:39:42+5:30
शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन प्रत्येक बुधवारी वेगवेगळ्या भागात सुरू केलेल्या ‘स्वच्छ परभणी’ मोहिमेला आता व्यापक स्वरुप आले असून, बुधवारी अपना कॉर्नर भागात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अनेकांनी स्वत:हून सहभाग नोंदवित साफसफाई केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन प्रत्येक बुधवारी वेगवेगळ्या भागात सुरू केलेल्या ‘स्वच्छ परभणी’ मोहिमेला आता व्यापक स्वरुप आले असून, बुधवारी अपना कॉर्नर भागात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अनेकांनी स्वत:हून सहभाग नोंदवित साफसफाई केली़
परभणी महानगरपालिकेच्या वतीने शहरात सध्या स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे़ यासाठी मनपाने राजगोपाल कालानी यांची स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली आहे़ मनपाच्या या स्वच्छता मोहिमेला बळ मिळावे म्हणून कालानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर बुधवारी शहरातील विविध विभागात स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे़
याचाच एक भाग म्हणून बुधवारी सकाळी अपना कॉर्नर भागात ही मोहीम राबविण्यात आली़ यावेळी महापौर मीनाताई वरपूडकर, उपायुक्त विद्या गायकवाड, सहाय्यक आयुक्त विनय मोहरीर, मीर शाकेर अली, डॉ़ राजगोपाल कालानी, अॅड़ अशोक सोनी, अॅड़ समीर दुधगावकर, बाबा मराठे, सतीश झंवर, डॉ़ आप्पाराव शेळके, डॉ़ गोपाळ जवादे, डॉ़ चारूशिला जवादे, डॉ़ सालीहा कौसर, डॉ़ विजय मंत्री, डॉ़ रवि भंडारी, धावपटू ज्योती गवते, सुहासिनी कावळे, डॉ़ विलास देशमुख, डॉ़ सुहास विभुते आदींनी सहभाग नोंदवित साफसफाई केली़ या मोहिमेत दोन ट्रॅक्टर व तीन घंटागाड्या भरून कचरा काढण्यात आला़
४विशेष म्हणजे यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वत:हून नाल्यांची साफसफाई केली़ यावेळी मनपाचे सफाई कर्मचारी कशा पद्धतीने काम करतात याचा अनुभवही या मान्यवरांना आला़
४त्यामुळे त्यांनी मनपा कर्मचाºयांच्या कामाविषयी आस्था व्यक्त केली. त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी करण्याचे काही डॉक्टरांनी जाहीर केले़
४यावेळी काही मान्यवरांनी मनपाला स्वच्छता अभियानाच्या कामासाठी निधीही जाहीर केला़ तसेच दर बुधवारी यापुढेही आणखी नव्या जोमाने ही स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निश्चित करण्यात आले़