सहा हजारांची लाच घेताना अव्वल कारकून चतुर्भूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 06:36 PM2019-07-18T18:36:26+5:302019-07-18T18:37:42+5:30
जळालेल्या शेत आखाड्याची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मागितली लाच
पाथरी (परभणी ) : जळालेल्या शेत आखाड्याची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अव्वल कारकूनास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १८ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमासरा रंगेहाथ पकडले आहे.
पाथरी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या आखाड्याला लाग लागून त्यात एक वासरु आणि शेती उपयोगी साहित्य जळाले होते. या प्रकरणात नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाथरी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून ज्ञानोबा सोनबा काळे हे ६ हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीवरुन १८ जुलै रोजी पाथरी तहसील कार्यालयात सापळा लावण्यात आला. त्यावेळी अव्वल कारकून ज्ञानोबा काळे यांनी तक्ररादार शेतकऱ्याकडून ६ हजार रुपयांची लाच मागणी करुन ती स्वीकारली. पथकातील अधिकाऱ्यांनी त्यास रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाठकर, उपाधीक्षक एन.जे.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, विवेकानंद भारती, हवालदार मिलिंद हनुमंते, अनिरुद्ध कुलकर्णी, अविनाश पवार, सचिन धबडगे, जहागीरदार, शेख शकील, अनिल कटारे, शेख मुखीद, चट्टे, सारिका टेहरे, दंडवते, चौधरी, बोके यांनी ही कारवाई केली.