परभणीत हमीभाव केंद्रावरील शेतमालाची खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:31 AM2018-01-17T00:31:50+5:302018-01-17T00:31:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : खरीप हंगामातील शेतमाल विक्री करताना शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने ...

Closing the purchase of farmland at Parbhaniit Guarantee Center | परभणीत हमीभाव केंद्रावरील शेतमालाची खरेदी बंद

परभणीत हमीभाव केंद्रावरील शेतमालाची खरेदी बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : खरीप हंगामातील शेतमाल विक्री करताना शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंदे्र सुरु केली. परंतु, जाचक अटी, नियम व निकषांमुळे शेतकºयांनी या केंद्राऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपला शेतमाल विक्री केला. तीन महिन्यात या केंद्रावर केवळ ४ हजार ३०० क्विंटल धान्याची खरेदी झाली आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. परंतु, जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन, मूग, उडीद या पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली. ज्या शेतकºयांनी उपलब्ध असलेल्या पाण्यावर सोयाबीन, मूग, उडीद या कडधान्याचे उत्पादन घेतले. त्यांना थोड्याफार प्रमाणात या पिकातून उत्पादनही झाले. मात्र गतवर्षी सारखी याहीवर्षी शेतमाल विक्री करताना कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने १० आॅक्टोबरपासून जिल्ह्यामध्ये पूर्णा, गंगाखेड, परभणी, मानवत, जिंतूर, सेलू या सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले.
या केंद्राच्या माध्यमातून सोयाबीनसाठी ३ हजार ५० रुपये, मुगासाठी ५ हजार ५७५ रुपये या हमीभाव दराने शेतमालाची खरेदी केली जावू लागली. परंतु, नाफेडच्या निकष, अटी व नियमांनी कडधान्य उत्पादक शेतकरी पुरता घायाळ झाला.
हमीभाव केंद्राऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपले सोयाबीन विक्री करण्यास शेतकºयांनी पसंती दिली. जिल्ह्यामध्ये सहा हमीभाव केंद्रावर तीन महिन्यात जवळपास ४ हजार ३०० क्विंटल सोयाबीन, मूग व उडीद या शेतमालाची विक्री झाली.
१३ जानेवारीपासून हमीभाव खरेदी केंद्रावरील शेतमाल खरेदीची मुदत संपल्याने हे केंद्र बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवून खाजगी बाजारपेठेतच आपला शेतमाल विक्री करण्यास प्राधान्य दिल्याचे हमीभाव खरेदी केंद्राकडून आलेल्या आकडेवाडीवरुन दिसून येते.
अशी झाली कडधान्याची खरेदी
नाफेडच्या वतीने १० आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. यामध्ये परभणी येथील खरेदी केंद्रावर ३९९.५० क्विंटल, उडीद शून्य तर सोयाबीनची ७२३ क्विंटल, मानवत येथील केंद्रावर मूग १७६. ५०, उडीद शून्य तर सोयाबीनची ७५३ क्विंटल, जिंतूर, मूग २१६ क्विंटल, उडीद ५६१ क्विंटल तर सोयाबीनची ३८५ क्विंटल, सेलू येथे मूग ६४७. ९१ क्विंटल, उडीद ९७.३५ क्विंटल तर सोयाबीनची २६२.३८ क्विंटल, पूर्णा मूग ७२ क्विंटल, उडीद २७.५० क्विंटल तर सोयाबीनची ४० क्विंटल खरेदी झाली. असे एकूण जिल्ह्यातील ६ केंद्रावर तीन महिन्याच्या कालावधीत केवळ ४ हजार ३०० क्विंटल कडधान्याची खरेदी करण्यात आल्याची माहिती नाफेडकडून देण्यात आली.
गंगाखेड केंद्रावर खरेदीच नाही
गंगाखेड शहर व तालुक्यातील शेतकºयांच्या खरीप हंगामातील शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी राज्य शासनाने मोठ्या थाटामाटात हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. परंतु, तीन महिने सुरु असलेल्या या खरेदी केंद्रावर सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकरी फिरकलाच नाही. त्यामुळे तीन महिन्याच्या कालावधीत या खरेदी केंद्रावर शेतमाल खरेदी झाली नाही.

Web Title: Closing the purchase of farmland at Parbhaniit Guarantee Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.