घोटाळेबाजांना मुख्यमंत्र्यांचे समर्थन- धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:24 AM2019-10-19T00:24:36+5:302019-10-19T00:25:27+5:30
आमच्या सरकारमध्ये घोटाळा नाही, म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोटाळेबाजांना समर्थन देतात, हाच घोटाळा नाही का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना उपस्थित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड: आमच्या सरकारमध्ये घोटाळा नाही, म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोटाळेबाजांना समर्थन देतात, हाच घोटाळा नाही का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना उपस्थित केला.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.मधुसूदन केंद्रे यांच्या प्रचारार्थ शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात मुंडे यांची शुक्रवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, उमेदवार डॉ. मधुसूदन केंद्रे, अॅड. संतोष मुंडे, बाबुराव गळाकाटु, मिथिलेश केंद्रे, माधव भोसले, युनूस शेख, अॅड.सय्यद अकबर, डॉ.फिरोज शेखल गिरीष सोळंके, उस्मान शेख आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये घोटाळा नाही, म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोटाळेबाजांना समर्थन देतात, हा घोटाळा नाही का? घोटाळ्यातून कमावलेल्या पैशांच्या जोरावर राजकारण करणाऱ्या उमेदवारांना सहकार्य करुन पापाचे भागीदार होऊ नका, असे आवाहन यावेळी मुंडे यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. हे सरकार शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक यांच्या हिताविरोधात असल्याचे ते म्हणाले.
राज्य व केंद्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांनीही घेतली आपली धास्ती
४राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील भाजपाच्या पदाधिकाºयांनीही आपली धास्ती घेतली असून माझा विजय रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माझ्या दारात सभा घेतली असल्याचे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.
४शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात राज्यातील व केंद्रातील भाजपाचे सरकार अपयशी ठरले आहे.
४देशातील समस्यांकडे जनतेचे लक्ष जावू नये, यासाठी त्यांना भावनिक केले जात आहे; परंतु, जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असे ते म्हणाले.