परभणीच्या रेल्वेस्थानकावर बसविले कोच लोकेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 01:15 AM2018-04-02T01:15:17+5:302018-04-02T11:35:42+5:30
येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर कोच लोकेटर बसविण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे़ अनेक महिन्यांपासून रखडलेले हे काम पूर्ण झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर कोच लोकेटर बसविण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे़ अनेक महिन्यांपासून रखडलेले हे काम पूर्ण झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे़
परभणी रेल्वे स्थानकावर एकूण ३ प्लॅटफॉर्म असून, परभणी ते मिरखेल या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर तीन क्रमांकाचा प्लॅटफॉर्म नियमित वापरास सुरुवात करण्यात आली़ नांदेडकडे जाणाऱ्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर तर मनमाडकडे जाणाºया गाड्या नियमितपणे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबविण्यात येत होत्या़ मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर असुविधा असल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत असे़ परभणी येथून औरंगाबाद, मनमाड, मुंबईकडे जाणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे.
विशेष म्हणजे, या प्लॅटफॉर्मवर कोच लोकेटर नसल्याने आरक्षण डबा नेमका कुठे येणार? याची माहिती मिळत नसल्याने स्थानकावर रेल्वे गाडी आल्यानंतर प्रवाशांची धावपळ होत होती. कोच लोकेटरच्या प्रश्नी ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला़ अखेर रविवारी रेल्वे स्थानकावरील कोच लोकेटर सुरू करण्यात आले आहे़ त्यामुळे मागील वर्षभरापासून प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर थांबली आहे़ प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर स्वच्छतागृह व इतर सुविधाही उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी होत आहे़