बाजार समितीने सुरू केली शेतमाल तारण योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:19 AM2021-09-19T04:19:06+5:302021-09-19T04:19:06+5:30

गतवर्षी सोयाबीन, तूर, मूग, चणा, ज्वारी, गहू, हळद हा शेतीमाल तारण ठेवून बाजार समितीमार्फत तारण कर्ज वाटप करण्यात आले ...

Commodity mortgage scheme launched by the Market Committee | बाजार समितीने सुरू केली शेतमाल तारण योजना

बाजार समितीने सुरू केली शेतमाल तारण योजना

Next

गतवर्षी सोयाबीन, तूर, मूग, चणा, ज्वारी, गहू, हळद हा शेतीमाल तारण ठेवून बाजार समितीमार्फत तारण कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे. २०२१-२२ च्या खरीप हंगामास सुरुवात झाली असून या चालू आर्थिक वर्षासाठी शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी स्वनिधीतून रकमेची तरतूद केली आहे. याकरिता शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल गोदामात ठेवल्यानंतर वखार महामंडळाकडून पावती घ्यावी, त्यावर पोत्यांची संख्या, मालाचे अंदाजे वजन, प्रतिक्विंटल दर या गोष्टी नमूद केल्या जातील. तारण कर्जासाठी अर्ज, १०० रुपयांच्या मुद्रांक पेपरवर करारनामा, ७-१२, पीकपेरा, बँक पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स प्रत ही कागदपत्रे बाजार समितीत जमा केल्यानंतर शेतमालाच्या प्रतवारीनुसार प्रचलित दराच्या एकूण किमतीच्या किंवा शासनाने ठरवून दिलेल्या हमीभाव यापैकी जो भाव कमी असेल त्याच्यावर तारण कर्ज धनादेशाद्वारे अदा करण्यात येणार आहे. या कर्ज रकमेची व्याजासह ६ महिन्यात परतफेड करून तारण माल ताब्यात न घेतल्यास या शेतमालाची बाजार समितीतर्फे विक्री केली जाणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती समशेर वरपूडकर, उपसभापती दिलीप अवचार, संचालक मंडळ तसेच सचिव संजय तळणीकर यांनी केले आहे.

Web Title: Commodity mortgage scheme launched by the Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.