परभणीत कर्मचाऱ्यानेच केली तक्रार; पोलीस दलातील शिस्त बिघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:55 AM2019-01-01T00:55:36+5:302019-01-01T00:55:55+5:30
जिल्हा पोलीस दलातील शिस्त बिघडली असून काही कर्मचाºयांकडून विशिष्ट कामांचा आग्रह धरला जात असताना वरिष्ठांचाही सन्मान ठेवला जात नाही, अशी तक्रार पोलीस दलातीलच एका कर्मचाºयाने ‘लोकमत’कडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा पोलीस दलातील शिस्त बिघडली असून काही कर्मचाºयांकडून विशिष्ट कामांचा आग्रह धरला जात असताना वरिष्ठांचाही सन्मान ठेवला जात नाही, अशी तक्रार पोलीस दलातीलच एका कर्मचाºयाने ‘लोकमत’कडे निवेदनाद्वारे केली आहे.
जुलैमध्ये पोलीस अधीक्षक पदी कृष्णकांत उपाध्याय यांची नियुक्ती झाली. त्यानंतर कामकाजात बेशिस्तपणा आलेल्या या पोलीसदलात उपाध्याय हे थेट आयपीएस अधिकारी असल्याने शिस्त लागेल, अशी कर्मचाºयांसह सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती; परंतु, ही अपेक्षा पोलीस कर्मचाºयांच्या घुसमटीमुळे फोल ठरु लागली आहे. या संदर्भात एका पोलीस कर्मचाºयाने ‘लोकमत’ला पाठविलेल्या पत्रात जिल्हा पोलीस दलातील अनेक बेशिस्त बाबींचे वर्णन केले आहे. त्यामध्ये काही कर्मचारी विशिष्ट कामासाठीच आग्रह धरतात. टायपिंग येत नाही, बीट माझे नाही, मला ट्रॉफिकचेच काम जमते, मी फक्त समन्स वॉरंटच पाहतो, मला सीसीटीएनएस येत नाही. बारनिशीच काम जमतं. फक्त वायरलेसच करणार, कोर्ट पेहेरवीच येते, मी मोहरीलकडेच काम करणार, मला क्राईमच येत नाही, मी एसआरपीतून आलोय, माझ्या विरोधात अहवाल पाठविला तरी मी कोणाला घाबरत नाही, मी आमूक धर्माचा आहे, ती तमूक पंथाचा आहे, अशा वल्गना करुन कामचुकारपणा केला जातो, असा आरोप या तक्रार अर्जात करण्यात आला आहे. वरिष्ठांना आदरपूर्वक जयहिंद म्हणण्यास काहींना कमीपणा वाटतो. वर्दीत कामकाज करीत असतानाच काही अधिकारी-कर्मचारी दारु पिऊन, गुटखा, तंबाखू खाऊन येत असतात. त्यामुळे सर्व सामान्यांमधून चुकीची माहिती पोलिसांविषयी पसरविली जात आहे. काही विशिष्ट व्यक्तींना सौजन्याची वागणूक दिली जाते. इतर सर्वसामान्यांना मात्र आरोपीच्या भावनेतून वागविले जाते. काही व्यक्ती शासकीय सेवा ही धर्मनिरपेक्ष असते हे विसरुन आॅनड्युटी आपल्या विशिष्ट धर्माचे पालन करतात, अशी खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
४झिरो पोलीस, होमगार्ड, खबरे यांच्याकडूनच तपासाची काम करुन घेतली जातात. त्यांना गुटखा, मटका, दारुचे, रेतीचे, रेशनचे, ढाबेवाल्यांचे, ट्रॉफिकचे कलेक्शन करण्याकामी वापरले जाते, अशांसाठी काम करणाºया कर्मचाºयांना-अधिकाºयांना वेगळी ड्युटी लागत नाही. जे कर्मचारी इमाने-इतबारे काम करतात, त्यांना मात्र ताण भोगावा लागतो. त्यांची मेहनत दुर्लक्षित होते. त्यांना हक्काची सुटी मिळत नाही, काही कर्मचारी पैसा हेच उद्दिष्ट बाळगून काम करतात. जणू पैसा हाच धर्म, कर्म आहे, असे वागतात. त्यामुळे पोलीस दलातील हेवेदेवे वाढत आहेत. प्रामाणिक आणि अप्रामाणिक व्यक्तींमध्ये दुफळी वाढली आहे. त्यामुळे पोलीस दलात शिस्त यावी, पोलीस दलाची बिघडलेली शिस्त सुधारण्यासाठी पाऊले उचलावीत, अशी अपेक्षा संबंधित पोलीस कर्मचाºयाने तक्रार अर्जाद्वारे व्यक्त केली आहे.