हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:17 AM2020-12-31T04:17:32+5:302020-12-31T04:17:32+5:30

सेलू : येथील नूतन महाविद्यालयाच्या पं. या. तरफदार सभागृहात संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सव नुकताच संपन्न झाला. या संगीत ...

Concluding remarks of Haribhau Charthankar Music Festival | हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाची सांगता

हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाची सांगता

Next

सेलू : येथील नूतन महाविद्यालयाच्या पं. या. तरफदार सभागृहात संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सव नुकताच संपन्न झाला. या संगीत महोत्सवात दिनांक २९ डिसेंबर रोजी शहरातील गायकांनी आपल्या शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी नूतन विद्यालयातील संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांनी मालकंस रागावर आधारित ‘कैसे कटे रजनी सजनी’ तर पूजा महाजन यांनी यमन कल्याण रागावर आधारित ‘सखी एरि आली पिया बिन’ सादर केले. त्यांना गजानन दळवे यांनी साथसंगत केली. यावेळी निषाद जोशी, शंतनू पाठक यांनीही शास्त्रीय गायन केले तर निरजकुमार वैष्णव यांनी तबलावादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीकांत उमरीकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय राखी जोशी यांनी करून दिला. सूत्रसंचालन अनुजा सुभेदार यांनी केले तर मल्हारीकांत देशमुख यांनी आभार मानले. या संगीत महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गंगाधर कान्हेकर, गिरीश लोडाया, यशवंत चारठाणकर, संतोष चारठाणकर, प्रा. नागेश कान्हेकर, डॉ. राजेंद्र मुळावेकर, सुरेश हिवाळे, प्रा. देवीदास ढेकळे, राजू फरीदखाने, धनंजय पठाडे, प्रभाकर सोळंके, प्रकाश काळबांडे, मनोज सोळंके, सखाराम बरसाळे, दत्ता रिठ्ठे, वैशाली चारठाणकर, कीर्ती राऊत यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Concluding remarks of Haribhau Charthankar Music Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.