नियाेजनशून्य कारभारामुळे बसस्थानकाची अवस्था वाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:15 AM2020-12-29T04:15:28+5:302020-12-29T04:15:28+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी येथील बसस्थानकाचे रूपांतर अद्ययावत अशा बसपोर्टमध्ये करण्यासाठी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ...

The condition of the bus stand is bad due to unplanned management | नियाेजनशून्य कारभारामुळे बसस्थानकाची अवस्था वाईट

नियाेजनशून्य कारभारामुळे बसस्थानकाची अवस्था वाईट

Next

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी येथील बसस्थानकाचे रूपांतर अद्ययावत अशा बसपोर्टमध्ये करण्यासाठी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी १३ कोटी ४ लाख ४८ हजार ६०० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात बसपोर्टच्या कामाला मंजुरी मिळाली. मात्र, तांत्रिक अडचणींचा अडथळा अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे मागील वर्षभरापासून परभणी बसस्थानकावर दररोज ये-जा करणाऱ्या १० हजार प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या बसस्थानकावर कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे चोरीच्या घटनांसह इतर समस्यांना सामोरे जावे

लागत आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या संघटनांनी प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी वारंवार आवाज उठविला. मात्र, प्रवाशांच्या सोयीसंदर्भात परभणी आगार प्रमुखांनी व प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत.

विशेष म्हणजे प्रवाशांच्या सोयीसाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांना स्वखर्चातून या बसस्थानकावर सूचना फलक बसवावे लागले. त्यामुळे या बसस्थानकावर प्रवाशांना सोयी सुविधांऐवजी असुविधांचा सामना वर्षभरापासून करावा लागत आहे.

शाैचालये ठरताहेत अडचणींचे

परभणी येथे बसपोर्टचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेले जुने सुलभ शौचालय हे अडगळीला पडले आहे.

प्रवाशांना बसमधून उतरून शौचालयात जाणे गैरसाेयीचे ठरत आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शौचालयाबरोबरच धुळीसह मूलभूत समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी वैतागले आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

नवीन बसपोर्टसाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या तात्पुरत्या शेडवरच हे बसस्थानक सुरू राहणार का, असा प्रश्न आहे.

चोरट्यांचा करावा लागतोय सामना

येथील बसस्थानकात मागील महिनाभरात चोरीच्या दोन-तीन घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये वयोवृद्धांसह महिलांना चोरट्यांनी सोडले नाही.

बसस्थानकात बसविण्यात आलेले ६ सीसीटीव्ही कॅमेरेही कुचकामी ठरत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत.

परभणी येथील तात्पुरत्या बसस्थानकावर लाइट, पाणी व सीसीटीव्हीची व्यवस्था आहे. सुलभ शौचालय प्रवाशांसाठी अडचणीचे ठरत आहे. मात्र, त्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात पावले उचलली जात आहेत. त्यामुळे लवकरच प्रवाशांसाठी गैरसोयीचा ठरणारा शौचालयाचा विषयही निकाली काढला जाईल.

- दयानंद पाटील, आगारप्रमुख

येथील बसस्थानकावर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रवासी येतात. मात्र, या ठिकाणी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही, तसेच सूचना फलक उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या गोष्टीचा विचार करून स्वखर्चातून या बसस्थानकावर ठिकठिकाणी सूचना फलक लावले.

- संभानाथ काळे, प्रवासी

परभणी आगारातील अनेक बस नादुरुस्त झाल्या आहेत, तर काही वेळेस चालक व वाहक उपलब्ध नसल्याने एकेक तास बसची वाट पाहावी लागत आहे, तसेच या बसस्थानकावर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने एसटी बसचा प्रवास खडतर होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- शिवकन्या जुंबडे, प्रवासी

Web Title: The condition of the bus stand is bad due to unplanned management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.