कृषी कायद्यांविषयी संभ्रम निर्माण केला जातोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:45+5:302020-12-23T04:14:45+5:30

येथील एमआयडीसी परिसरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात २२ डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीने संवाद व शेतकरी मेळावा ...

Confusion is being created about agricultural laws | कृषी कायद्यांविषयी संभ्रम निर्माण केला जातोय

कृषी कायद्यांविषयी संभ्रम निर्माण केला जातोय

Next

येथील एमआयडीसी परिसरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात २२ डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीने संवाद व शेतकरी मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी डॉ.बोंडे बोलत होते. यावेळी भाजपचे मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, आ.पाशा पटेल, आ.तानाजी मुटकुळे, माजी आ.विजय गव्हाणे, रामराव वडकुते, मोहन फड, सुरजीतसिंह ठाकूर, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, विठ्ठलराव रबदडे, रामकिशन रौंदळे, समीर दुधगावकर, अमृतराव शिंदे, किसान मोर्चाचे समन्वयक अजय गव्हाणेे, बालाप्रसाद मुंदडा, रंगनाथ सोळंके, अंकुश आवरगंड, उद्धव नाईक, बळीराम कदम आदींची उपस्थिती होती. यावेळी बोंडे यांनी केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात आ.पाशा पटेल, माजी आ.विजय गव्हाणे, डॉ.सुभाष कदम यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Confusion is being created about agricultural laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.