काँग्रेस-राष्ट्रवादीवाले दरोडेखोर, उद्धव यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 05:55 AM2019-04-16T05:55:52+5:302019-04-16T05:56:36+5:30

पाच वर्षांपूर्वी तुमचं सरकार असताना ए टू झेड बाराखड्या कमी पडतील, अशा घोटाळ्यांचं पुस्तक मी काढलं होतं.

Congress-NCP rioters, Uddhav attacks | काँग्रेस-राष्ट्रवादीवाले दरोडेखोर, उद्धव यांचा हल्लाबोल

काँग्रेस-राष्ट्रवादीवाले दरोडेखोर, उद्धव यांचा हल्लाबोल

googlenewsNext

परभणी : पाच वर्षांपूर्वी तुमचं सरकार असताना ए टू झेड बाराखड्या कमी पडतील, अशा घोटाळ्यांचं पुस्तक मी काढलं होतं. ते वाचा आणि मग, मी तुम्हा काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना प्रश्न विचारतो, स्वत: घोटाळेबाज असताना आमच्यावर आरोप करता, तुम्हाला लाज वाटते का, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केली़
परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका आल्यावर शरद पवारांना दुष्काळ असल्याचे कळले़
पण, गेली पाच वर्षे शिवसैनिक दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जात आहेत़ तेव्हा हे राष्ट्रवादीवाले घरामध्ये स्वत:ला कोंडून घेऊन बसले होते़ चारा छावणीला शरद पवारांनी भेट दिल्यानंतर एक गंमत मला कळली, तिथली लोकं घाबरली होती़ त्यांना मी का घाबरलात असे विचारले असता, ते म्हणाले की, गेल्या वेळी यांचं सरकार होतं, त्यावेळी यांनी शेण घोटाळा केला होता़ काय खायचं सोडलं नव्हतं़ शेण सुद्धा खाल्लं होतं त्यांनी. आता यांना दुष्काळग्रस्तांचा कळवळा
आला आहे़ तुम्ही फिरतांय, कितीही फिरा, पण जो जोश भगव्यामध्ये
तो तुमच्या पक्षाच्या फडक्यामध्ये नाही़
आमच्याकडे जोश आहे, तुमच्याकडे द्वेष आहे़ भ्रष्टाचाराचे आरोप कोणावर करतायं? स्वत: घोटाळेबाज आहात तुम्ही आणि चोर म्हणून युतीवर आरोप करता? दरोडेखोरांनी चोर कोण आहे ते ठरवायचा हा कोणता न्याय?, असा सवाल उद्धव यांनी केला.
>‘शरद पवारांचे राजकारण संपले’
एकदा सभेत मी लोकांना विचारलं, शरद पवारांची ओळख काय? तर लोकं म्हणाली भ्रष्टवादी़ मग शरद पवार पंतप्रधान चालतील का? असा प्रश्न करताच ते म्हणाले, ‘शरद पवारांना सांगा तुमचं राजकारण संपलयं़’

Web Title: Congress-NCP rioters, Uddhav attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.