१०० कंपोस्ट प्रकल्प उभारणीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:18 AM2020-12-06T04:18:23+5:302020-12-06T04:18:23+5:30
सेलू - जागतिक मृदा दिनानिमित्त तालुक्यातील डुगरा येथे ५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान जमीन आरोग्य पत्रिका ...
सेलू - जागतिक मृदा दिनानिमित्त तालुक्यातील डुगरा येथे ५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी १०० कंपोस्ट प्रकल्पाच्या उभारणीचा संकल्प शेतकऱ्यांनी केला.
५ डिसेंबर रोजी शेतकरी प्रशिक्षण गावात असलेल्या भागूबाई विठ्ठल तायडे यांचा हरभरा शेतात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र परभणीचे शास्त्रज्ञ डॉ. ए. एम. काकडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी गावातील शेतकऱ्यांनी शेतीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी १०० गांडुळ व नाडेप कंपोस्ट टाके बनवण्याचा संकल्प केला. यावेळी चिकलठाणा मंडल कृषी अधिकारी डी.एस. तोष्णीवाल यांनी माती नमुना कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी शाम पझई ,भास्कर जाधव, सरपंच गौकर्णाबाई भूजबळ, पोलीस पाटील गणपतराव देशमुख हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक बलभीम आवटे, नामदेव थटवले, मारोतीराव तारडे यांनी प्रयत्न केले.