घरकुलांची बांधकामे अर्धवट अवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:21+5:302021-06-25T04:14:21+5:30
सिमेंट रस्त्याचे काम पडले बंद परभणी : जिंतूर-परभणी या रस्त्याचे काम सध्या तालुक्यातील टाकळी शिवारात सुरू आहे. मात्र मागील ...
सिमेंट रस्त्याचे काम पडले बंद
परभणी : जिंतूर-परभणी या रस्त्याचे काम सध्या तालुक्यातील टाकळी शिवारात सुरू आहे. मात्र मागील चार दिवसांपासून सिमेंट काँक्रेटीकरण करणाऱ्या मशीन बंद पडली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सध्या तरी ठप्प आहे. दोन वेळा मशीन बंद पडल्याने रस्ता कामास विलंब होत आहे.
रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
परभणी: शहरातील मोंढा ते कडबी मंडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. बाजारपेठेतील मुख्य भागांना जोडणारा हा रस्ता आहे. यामुळे वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. मात्र रस्ता उखडल्याने वाहनधारकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागत आहे.
कात्नेश्वर शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम
कात्नेश्वर : पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वट पौर्णिमेनिमित्त वडाचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सूचिता पाटेकर, गटविकास अधिकारी अमित राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी प्रशालेतील उपक्रमांची पाहणी करण्यात आली.