बांधकाम साहित्य रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:17 AM2021-04-10T04:17:14+5:302021-04-10T04:17:14+5:30
ग्रामीण भागात अवैध दारू विक्री सेलू : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची विक्री केली जात आहे. विशेष ...
ग्रामीण भागात अवैध दारू विक्री
सेलू : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे, देशी दारूची दुकाने बंद असल्याने चोरट्या मार्गाने देशी दारूचा साठा करून अधिक दराने दारूची विक्री केली जात आहे. परिणामी, ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
अर्ध शटर उघडून व्यवसाय
सेलू : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा आणि पार्सल देण्याची परवानगी असली, तरी शहरात इतर अस्थापनाचे अर्धे शटर उघडून व्यवसाय केला जात आहे. पोलिसांचे वाहन येताच शटर बंद केले जाते. मात्र, काही वेळातच पुन्हा शटर उघडून व्यवसाय केला जात आहे.
शासकीय कार्यालयात शुकशुकाट
सेलू : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने शासकीय कार्यालयात ५० टक्केच कर्मचारी संख्या ठेवली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट आहे. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबले आहेत. कोरोनाच्या नावावर अनेक कार्यालयातील कर्मचारी दांडी मारत आहेत.
जवळा येथील पुलाची दुरवस्था
सेलू : चिकलठाणा ते जवळा जिवाजी रस्त्यावरील जुनाट पुल आहे. अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. प्रत्येक पावसाळ्यात या पुलाचा मोठा भाग पुरामुळे वाहून जातो. त्यामुळे वाहतूक बंद होते. दरवर्षी दगड आणि मुरुम टाकून पुलाची डागडुजी केली जाते. त्यामुळे नवीन पुलाचे काम करावे, अशी मागणी होत आहे.