जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:14 AM2021-01-14T04:14:37+5:302021-01-14T04:14:37+5:30

रस्त्यावरील कचऱ्याने वाढविली दुर्गंधी परभणी : शहरात विविध भागांत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, दुर्गंधी वाढली आहे. ...

Construction of Zilla Parishad building is slow | जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम संथगतीने

जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम संथगतीने

Next

रस्त्यावरील कचऱ्याने वाढविली दुर्गंधी

परभणी : शहरात विविध भागांत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, दुर्गंधी वाढली आहे. जिल्हा परिषद इमारतीच्या संरक्षक भिंतींलगत मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे. हा कचरा उचलावा अशी, नागरिकांची मागणी आहे

प्रवेशद्वारासमोरच लावली वाहने

परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच मोठ्या प्रमाणात वाहने लावली जात आहेत. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात प्रवेश करताना वाहनांचा अडथळा पार करावा लागत आहे. नो पार्किंगच्या जागेत लावली जाणारी ही वाहने हटवावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

पीकविम्याच्या प्रश्नावर प्रशासनाची चुप्पी

परभणी : जिल्ह्यात सोयाबीन, कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना, विमा कंपनी मात्र पीकविमा अदा करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. अनेक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित असताना, प्रशासन मात्र या प्रश्नावर चुप्पी साधून आहे.

सवारी रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी

परभणी : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता पूर्णतः कमी झाला आहे. रेल्वे प्रशासनाने सवारी रेल्वेगाड्या सुरू करून प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. सध्या केवळ विशेष आणि एक्स्प्रेस गाड्या सुरू असल्याने ग्रामीण प्रवाशांची गैरसोय कायम आहे.

आरटीपीसीआर चाचण्यांवर प्रशासनाचा भर

परभणी : जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने विविध घटकांच्या चाचण्या करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या मांस विक्रेत्यांची चाचणी करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे.

Web Title: Construction of Zilla Parishad building is slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.