पाणी उपसा करणाऱ्या ठेकेदारास अडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:42 AM2019-01-12T00:42:03+5:302019-01-12T00:43:20+5:30
तालुक्यातील सोमठाणा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोअर दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या कामासाठी पाणी नेत असलेल्या ठेकेदाराला ११ जानेवारी रोजी येथील ग्रामस्थांनी अडविले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हे पाणी गावासाठी आरक्षित करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : तालुक्यातील सोमठाणा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोअर दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या कामासाठी पाणी नेत असलेल्या ठेकेदाराला ११ जानेवारी रोजी येथील ग्रामस्थांनी अडविले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हे पाणी गावासाठी आरक्षित करण्याची मागणी केली.
मानवत तालुक्यातील सोमठाणा गावाजवळ लोअर दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना ठेकेदार कंपनीने कामासाठी मुरूमाचे उत्खनन केले होेते. उत्खनन झालेल्या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे जनावरांना पिण्यासाठी हे पाणी आरक्षित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तहसीलदार डी.डी. फुफाटे यांच्याकडे नुकतीच केली होती.
ग्रामस्थांनी पाणी आरक्षित करण्याची मागणी केलेली असताना ११ जानेवारी रोजी कालव्याचे काम करणाºया ठेकेदार कंपनीचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी आले होते. ही बाब ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी पाणी असलेल्या ठिकाणी आंदोलन करीत ठेकेदार कंपनीस पाणी नेऊ दिले नाही. यावेळी सरपंच राजाराम कुकडे, ग्रामपंचायत सदस्य रविकांत निर्वळ, माधव निर्वळ, परमेश्वर निर्वळ, बाबासाहेब भदर्गे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे तहसील प्रशासनाने पाणी उपसा न करण्याच्या सूचना दिल्या असून पाणी उपसा थांबविण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या मागणीकडे तहसीलचे दुर्लक्ष
४मानवत तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने पहिल्याच यादीमध्ये मानवत तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश केला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मानवत तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान अत्यल्प राहिल्याने डिसेंबर महिन्यातच तालुक्याची पाणीपातळी खालावली. परिणामी नदी, नाले, ओढे कोरडेठाक पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच तालुक्यातील मानवत येथील सोमठाणा येथील मुरूमाने उत्खनन केलेल्या ठिकाणी साचलेले पावसाचे पाणी जनावरांना पिण्यासाठी आरक्षित ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन ३ जानेवारी रोजी केली होती.
४मागणी करूनही तहसील प्रशासनाने सोमठाणा ग्रा.पं.च्या ठरावाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम करणाºया ठेकेदाराने पाणी उपसण्यास सुरु केली. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाणी न उपसण्याच्या तोंडी सूचना संंबंधित ठेकेदाराला तहसीलदारांना द्याव्या लागल्या.
पुढील आदेश येईपर्यंत पाणी उपसा न करण्याच्या तोंडी सूचना संबंधित ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या आहेत.
-डी.डी. फुफाटे,
तहसीलदार, मानवत