माथाडी कायद्याची अंमबजावणी करण्यासाठी परभणीत हमालांनी काढला मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 12:45 PM2017-11-23T12:45:09+5:302017-11-23T12:47:45+5:30
हमाल - माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी संपावर गेलेल्या हमालांनी आज सकाळी मोंढा बाजारपेठेतून मोर्चा काढून संपाची तीव्रता आणखी वाढविली.
परभणी : हमाल - माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी संपावर गेलेल्या हमालांनी आज सकाळी मोंढा बाजारपेठेतून मोर्चा काढून संपाची तीव्रता आणखी वाढविली. बुधवारपासून याच मागणीसाठी शहरातील सर्व हमालांनी बेमुदत बंद पुकारला आहे.
परभणी जिल्ह्यात माथाडी बोर्डाची स्थापना झाली आहे. सुमारे तेरा वर्षांपासून हा बोर्ड स्थापन झाला असला तरी या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांचे नुकसान होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर परभणीच्या मोंढ्यातील हमाल कामगारांनी २२ नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे मोंढ्यातील कामकाज ठप्प पडले आहे.
दरम्यान, याच मागणीसाठी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हमालांनी मोंढा बाजारपेठेतून घोषणाबाजी करीत मोर्चा काढला. सुमारे तीनशे ते चारशे हमाल या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी जे व्यापारी खाजगी कामगारांमार्फत माल भरत होते, त्या व्यापा-यांचे कामकाज बंद पाडण्यात आले. मोर्चामुळे संपाची तीव्रता आणखीच वाढली आहे.