आषाढीनिमित्त काढली कोरोना जागृती दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:13 AM2021-07-21T04:13:56+5:302021-07-21T04:13:56+5:30
कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे साध्या पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. दरवर्षी निघणाऱ्या दिंड्यांनाही या ...
कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे साध्या पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. दरवर्षी निघणाऱ्या दिंड्यांनाही या वर्षी फाटा देण्यात आला. येथील एन.व्ही.एस. मराठवाडा हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत जनजागृतीचा उद्देश समोर ठेवून मंगळवारी कोरोना जागृती दिंडी काढली. संतांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. या वेळी संत ज्ञानेश्वरांच्या वेशभूषेत अनिकेत इंगोले, संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत रावी ढवळे तर संत एकनाथ यांच्या वेशभूषेत निर्गुण जोशी आणि संत तुकाराम यांच्या वेशभूषेत सर्वज्ञ विजय सुरवसे हे दिंडीमध्ये सहभागी झाले होते. परिसरातील नागरिकांनी दिंडीचे स्वागत केले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक बाळकृष्ण कापरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक इंगळे, शिवाजी जोशी, एस.एस. पाटील, साळवे, स्मिता ढगे, अनंत बागुल, रामपूरकर, रोडे, श्रीपाद कुलकर्णी आदींसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.