कोरोनाने जिल्ह्यात तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:26+5:302021-06-22T04:13:26+5:30
परभणी : कोरोनाने जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी रुग्णांचे मृत्यू कमी होत ...
परभणी : कोरोनाने जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी रुग्णांचे मृत्यू कमी होत नसल्याने चिंता कायम आहेत.
कोरोना संसर्ग कमी झाल्याने एकीकडे नागरिकांना दिलासा मिळत असला तरी उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यू मात्र सुरूच आहेत. दररोज रुग्णांचे मृत्यू होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. सोमवारी तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालय, आयटीआय हॉस्पिटल आणि एका खासगी रुग्णालयात प्रत्येकी एक रुग्ण मृत्यू पावला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. मागील दीड महिन्यांपासून दररोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे ही बाब चिंतेची बनत आहे.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग लक्षणीयरीत्या घटला आहे. सोमवारी १ हजार ९०२ नागरिकांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या १ हजार ७१७ अहवालांमध्ये १८ आणि रॅपिड टेस्टच्या २८५ अहवालांमध्ये तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजार ६२९ झाली असून, ४९ हजार ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ हजार २७७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या २६० रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी दिवसभरात २६ रुग्णांना सुट्टी देण्यात आली.