कोरोनाने शिकविले कॉस्टकटिंग; किचनपासून कटिंगपर्यंत खर्चकपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:14 AM2021-07-11T04:14:07+5:302021-07-11T04:14:07+5:30

दैनंदिन गरजेच्या खर्चांबरोबरच विनाकारण खर्च करण्याची सवय अनेकांना लागली होती. कोरोनाच्या संसर्ग काळात व्यवहार बंद असल्याने हे सर्व खर्च ...

Corona taught costcutting; Cost reduction from kitchen to cutting! | कोरोनाने शिकविले कॉस्टकटिंग; किचनपासून कटिंगपर्यंत खर्चकपात!

कोरोनाने शिकविले कॉस्टकटिंग; किचनपासून कटिंगपर्यंत खर्चकपात!

Next

दैनंदिन गरजेच्या खर्चांबरोबरच विनाकारण खर्च करण्याची सवय अनेकांना लागली होती. कोरोनाच्या संसर्ग काळात व्यवहार बंद असल्याने हे सर्व खर्च कपात झाले. त्यातून नागरिकांना बऱ्यापैकी कपातीची सवय लागली आहे. मागील दीड वर्षांपासून घरखर्च आटोक्यात आणत मिळणाऱ्या रकमेवरच भागविले जात आहे. पूर्वी कुटुंबासह बाहेर जेवण करण्यासाठी जाण्याची हौस अनेकांना होती. परंतु, लॉकडाऊनने ही सवय मोडीत काढली आहे. हॉटेलमध्ये जाऊन जेवणावर केला जाणारा खर्च टाळला जात आहे. याशिवाय वीजबिल, मोबाईलवर होणारा खर्च, पेट्रोल, डिझेल खर्चातही अनेकांनी कपात केली असल्याचे दिसून येत आहे.

कुठे कुठे केली

कॉस्ट कटिंग

लॉकडाऊनपूर्वी आठवड्यातून दोन-तीनवेळा कुटुंबासह बाहेर हॉटेलमध्ये जेवणासाठी जात होतो. लॉकडाऊनमध्ये हॉटेल्स बंद होते. त्यामुळे घरीच विविध पदार्थ करून खाण्याची सवय लागली.

प्रवासावरही मोठ्या प्रमाणात खर्च केला जात होता. महिन्यातून किमान दोन-तीनवेळा गरज नसतानाही प्रवास केला जात होता. मागील काही महिन्यांपासून विनाकारण प्रवास करणे टाळले जात आहे.

वीजबिल, मोबाईलचा डाटा यासाठीदेखील अनावश्यक खर्च होत होता. नको असलेले किंवा अतिरिक्त असलेले मोबाईल क्रमांक बंद करून गरजेएवढेच मोबाईल सुरू ठेवले जात आहेत.

हॉटेलिंग थांबविल्याने दोन हजार वाचले...

एन्जॉय म्हणून बाहेर जेवायला जात असे. मुलांनाही त्याची सवय लागली होती. त्यामुळे महिनाभरातून किमान एखाद्यावेळी तरी हॉटेलमध्ये जेवण करीत होतो. त्यामुळे महिनाभरातून एक ते दीड हजारांचा खर्च होत होता. तो वाचला आहे, असे अनिल गायके यांनी सांगितले.

दररोजच्या जेवणासाठी पूर्वी आठवडाभराच्या भाज्या एकाचवेळी घेतल्या जात होत्या. त्यात अनेकवेळा काही भाज्या खराबही होत होत्या. त्यामुळे आता दररोजची भाजी दररोज खरेदी करण्याची सवय लावली. किमान ५०० रुपयांची बचत झाल्याचे फुलपगार यांनी सांगितले.

लॉकडाऊन काळात सलून्स बंद असल्याने दाढी घरी करण्याची सवय लागली. पूर्वी महिन्यातून तीन ते चारवेळा दाढी करण्यासाठी सलूनमध्ये जात होतो. आता मात्र घरीच दाढी करीत आहे. त्यामुळे महिन्याकाठी ७० ते ८० रुपयांची बचत करीत असल्याचे लक्ष्मण वैद्य यांनी सांगितले.

Web Title: Corona taught costcutting; Cost reduction from kitchen to cutting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.