मनपात येणाऱ्यांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:56+5:302021-03-21T04:16:56+5:30

उद्यानातील झाडे सुकू लागली परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील उद्यानातील झाडांना नियमित पाणी दिले जात नाही. त्यामुळे ही ...

Corona test of those who come to Manpat | मनपात येणाऱ्यांची कोरोना चाचणी

मनपात येणाऱ्यांची कोरोना चाचणी

Next

उद्यानातील झाडे सुकू लागली

परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील उद्यानातील झाडांना नियमित पाणी दिले जात नाही. त्यामुळे ही झाडे सुकू लागली आहेत. येथील लाॅनही वाळून गेली आहे. या उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचारी नसल्याने ही स्थिती दिसून येत आहे.

आयुक्तांच्या आवाहनला अधिकाऱ्यांचा प्रतिसाद

परभणी : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विविध कार्यालयीन प्रमुखांना सुंदर माझे कार्यालय ही संकल्पना राबविण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभावीपणे होताना दिसून येत आहे. अधिकाऱ्यांचे कार्यालय स्वच्छ करण्यात आले असून कृत्रिम झाडेही ठेवण्यात आली आहेत.

मनपातील कर्मचारी दुपारीच गायब

परभणी : शहर महानगरपालिकेतील अनेक कर्मचारी दुपारीच गायब होत असल्याचा प्रकार शुक्रवारी पहावयास मिळाला. दुपारी १वाजेच्या सुमारास मनपा कार्यालयातील विविध विभागातील कर्मचारी टेबलवर दिसून आले नाहीत. त्यामुळे विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांना रिकामच्या हाताने परतावे लागले. मनपा आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

अस्ताव्यस्त वाहनांमुळे रहदारीस अडथळा

परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या ईमारतीच्या परिसरात कामानिमित्त येणारे नागरिक अस्ताव्यस्त वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे रहदारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. जि.प. सीईओंच्या कक्षासमोरच हे चित्र नियमित पहावयास मिळत आहे. असे असताना याकडे लक्ष देण्यास अधिकारी तयार नाहीत. त्यामुळे कर्मचारी नाराज आहेत.

Web Title: Corona test of those who come to Manpat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.