Corona Virus In Parbhani : सामान्य रूग्णांना दिलासा; आरोग्य विभागाच्या निर्देशानंतर पुन्हा खाजगी दवाखाने झाले सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 03:46 PM2020-03-27T15:46:20+5:302020-03-27T15:47:54+5:30
लॉकडाऊननंतर खाजगी दवाखाने बंद होती
सेलू: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आल्या नंतर शहरातील काही खाजगी डाॅक्टरांनी दवाखाने बंद ठेवली होती. माञ जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपजिल्हा रुग्णालयाचे वैघकीय अधिक्षक डाॅ संजय हरबडे यांनी गुरूवारी उशीरा शहरातील सर्व खाजगी डाॅक्टरांना दवाखाने सुरू करण्याची सुचना दिल्यानंतर शुक्रवारी बंद असलेले दवाखाने सुरू करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासन तसेच आरोग्य विभाग युध्द पातळीवर काम करत आहे. शहर आणि ग्रामीण भागातील आरोग्य विभागाची यंञणा मोठ्या हिंमतीने कोरोनाशी लढा देत आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन शहरातील काही खाजगी डाॅक्टरांनी आपली ओपीडी सुरू ठेवली होती. माञ काही खाजगी डाॅक्टरांची ओपीडी बंद असल्याने गरजू रूगणांची गैरसोय होत होती. त्यामुळे रूग्णाच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडून विचारणा केली जात होती. मधुमेह, हदयविकार, बालरोग तज्ञ, स्ञीरोग, आयुवैदीक, जनरल फिजिशन, होमिओपॅथी, दंत विकार, कान ,नाक, घसा, नेञरोग तज्ञांनकडे तपासणी करण्यासाठी रूग्ण येत असतात. माञ काही तज्ञांनी आपले खाजगी दवाखाने बंद ठेवली होती. त्यामुळे रूग्ण हवालदल झाले होते. उपजिल्हा रुग्णालयात कोरोनासाठी विशेष कक्ष, आणि बाहेर गावाहून परतलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा उभी केली आहे. मधुमेह, हदय रोग हे रूग्णालयात उपलब्ध नाहीत. परिणामी शहरातील या आजाराचे रूग्ण नियमित तपासणी आणि ञास झाल्यानंतर ज्या डाॅक्टराकडे नियमित तपासणी करण्यासाठी आणी सल्ला घेण्यासाठी या तज्ञांनकडे येतात. लाॅक डाऊन नंतर शहरातील काही खाजगी डाॅक्टर यांनी ओपीडी बंद केली होती. माञ जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शुक्रवारी सकाळ पासून बंद ठेवलेली दवाखाने सुरू करण्यात आली आहेत. यामुळे रूग्णांना मोठा दिलासा मिळाला असला तरी लाॅकडाऊन संपेपर्यंत ही सेवा नियमित स्वरूपात चालू ठेवणे आवश्यक आहे.
खाजगी डाॅक्टर यांनी नियमित सेवा द्यावी
शहरातील काही खाजगी दवाखाने लाॅकडाऊननंतर बंद असल्याचे नागरिकांची तक्रार होती. हदय रोग, मधुमेह, नेञरोग आणि अस्थीरोग तज्ञांनची दवाखाने सुरू नसल्याचे दिसून आले होते. आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गुरूवारी शहरातील सर्व खाजगी दवाखाने सुरू करण्याची सुचना देण्यात आली आहे. शुक्रवारी बंद असलेली अनेक खाजगी दवाखाने सुरू झाले आहेत. ज्यांना सुचना देऊनही दवाखाने बंद ठेवली आहेत. अशांचे अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवले जाणार आहेत.
- डॉ. संजय हरबडे,वैद्यकीय अधीक्षक