कोरोनाकाळात छळ, बायकोविरोधात ६० तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:12 AM2021-07-23T04:12:39+5:302021-07-23T04:12:39+5:30
कोरोनाकाळात दुसऱ्या लाटेमध्ये तीन ते चार महिने लॉकडाऊन होते. या कालावधीत पती-पत्नी दोघेही बराच काळ घरी एकत्र असल्याने किरकोळ ...
कोरोनाकाळात दुसऱ्या लाटेमध्ये तीन ते चार महिने लॉकडाऊन होते. या कालावधीत पती-पत्नी दोघेही बराच काळ घरी एकत्र असल्याने किरकोळ कारणावरून वाद होण्याचे प्रकार वाढले. यात वादाचे रूपांतर गुन्हे दाखल करण्यापर्यंत गेले. काही ठिकाणी महिलांचा तर काही ठिकाणी पुरुषांचा छळ झाल्याचे प्रकार समोर आले.
पुरुषांच्या हक्कासाठी कोण लढणार?
पत्नी किरकोळ कारणावरून घराबाहेर पडली. मागील एक वर्षापासून ती परतली नाही. याबाबत अर्ज करून किंवा केस दाखल करून उपयोग नाही. यामध्ये अनेक वर्षे प्रकरण निकाली निघण्यास लागतात. यामुळे पुरुषांच्या अडचणीबाबत कोणीही गंभीर नाही.- एक पत्नीपीडित
कोरोनाकाळात
तक्रारी वाढल्या
पती वेळ देत नाही. मुलांचा सांभाळ करत नाही. तसेच आई -वडिलांसोबत राहतो, पैशाचा हिशेब देत नाही, अशा कारणावरून पत्नीने पतीसोबत वाद केल्याचे प्रकार काही प्रकरणांत घडले आहेत. तसेच किरकोळ कारणावरून हे अर्ज दाखल झाले आहेत.
आर्थिक टंचाई आणि अतिसहवास
कोरोनामुळे काहींची नोकरी गेली, तर काही जण घरून काम करीत होते. या कालावधीत पगार कमी झाले, तर काहींचे पगार बंद झाले. यातच दररोज घरीच असल्याने पत्नीशी संवाद होण्याऐवजी किरकोळ गोष्टीतून विसंवाद घडू लागला. यातून तंटे वाढले.