coronavirus : सेलूत क्वारंटाईनसाठी ११० बेड सज्ज; दोन वसतिगृह घेतली ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 02:26 PM2020-03-25T14:26:24+5:302020-03-25T14:29:04+5:30
आयसोलेशन विभागात तीन शिफ्टमध्ये काम सुरू
सेलू:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाने देशासह जगाची झोप उडाली आहे. संपूर्ण देश आज लाॅक डाऊन आहे. महाराष्ट्र राज्य दुस-या टप्प्यात असल्याने आरोग्य विभाग राञ दिवस काम करत आहे. या टप्प्यात सर्व काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने ११० कोरोटाईन बेड तयार ठेवले आहेत.
उपजिल्हा रुग्णालयात आयसोलेशन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यात एकाच वेळी वीस रूग्णावर उपचार केले जाऊ शकतात. माञ ज्या व्यक्तींना कोरोना संक्रमित झाला आहे अशाच रूग्णांना त्या कक्षात ठेवले जाणार आहे. तसेच कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीसाठी आणि संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाने शहरातील अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह तसेच तहसील रोडवरील मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहाची इमारत ताब्यात घेतली आहे.
या दोन्ही वसतिगृहात तब्बल ११० खाटांची व्यवस्था होणार आहे. तसेच गरज भासल्यास तहसील रोडवरील मुलांचे वसतिगृह ही ताब्यात घेतले जाऊ शकते. दुबई, अमेरिका, रशिया आदी परदेशातून सेलू शहर व परिसरात परतलेल्या सर्व व्यक्तीची तपासणी करण्यात आली आहे. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी त्यांना हातावर शिक्के मारून घरातच क्वारंटाईन करण्याची सुचना देण्यात आली आहे.
उपजिल्हा रुग्णालयात ४५ कर्मचारी करत आहेत काम
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर सह ४५ कर्मचारी आणि आरोग्य सेवक दिवस राञ सेवा देत आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन आयसोलेशन विभागात तिन शिफ्ट मध्ये काम सुरू आहे. तसेच नेहमीत पणे बाहय रूग्ण आणि अंतर विभागात सेवा दिली जात आहे. तसेच परदेशातून परतलेल्या व्यक्तीची माहिती घेऊन आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. ग्रामीण भागातून गावी परतलेल्या काही ग्रामस्थांची तपासणी केली जात आहे.
- डाॅ संजय हरबडे वैघकीय अधिक्षक , सेलू