coronavirus : परभणी जिल्ह्यात आणखी 14 बाधित वाढले; एका पोलीस कर्मचाऱ्याचा लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 11:53 PM2020-05-24T23:53:57+5:302020-05-24T23:55:02+5:30
यात ११ जण गंगाखेड तालुक्यातील आहेत
परभणी : जिल्ह्यात आणखी १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यातील ११ जण गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेले आहेत.
परभणी जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनास रविवारी रात्री नांदेड येथील प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी १४ जणांचा अहवाल पोझिटीव्ह आला आहे. त्यात ११ जण गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथे ४ दिवसांपूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील आहेत. तर एका जण परभणी शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी आहे. एक जण सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील रहिवासी असून अन्य एक जण माळसोन्ना येथील रहिवासी असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर् यांनी दिली.
जिल्ह्यात आता कोरोनाबाधित व्यक्तींची एकूण संख्या ३६ झाली असून त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर एक जण कोर नामुक्त झाला आहे. कोरूनाबाधित ३४ जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.