Coronavirus : परभणी जिल्ह्यात कोरोनाचा २४ वा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 08:54 AM2020-07-27T08:54:28+5:302020-07-27T08:55:26+5:30
शहरातील इंदिरा नगर भागातील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
Next
ठळक मुद्दे ८ दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले
परभणी : शहरातील इंदिरा नगर भागातील ४८ वर्षीय कोरोनाबधित व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी मध्यरात्री २ च्या सुमारास मृत्यू झाला.
परभणी शहरातील इंदिरा नगर भागातील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाल्याने २३ जुलै रोजी दुपारी १.२५ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना या व्यक्तीचा रविवारी मध्यरात्री २ च्या सुमारास मृत्यू झाला.
जिल्ह्यात कोरोनाचा हा २४ वा बळी ठरला आहे. यापूर्वी २३ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या ८ दिवसांमध्ये कोरोनाबधित व्यक्तीच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.